७/१२ वर बोजा टाकणार म्हणताच ज्येष्ठांची संख्या घटली, एसटीच्या मार्ग तपासणी दरम्यानचा किस्सा  file photo
छत्रपती संभाजीनगर

७/१२ वर बोजा टाकणार म्हणताच ज्येष्ठांची संख्या घटली, एसटीच्या मार्ग तपासणी दरम्यानचा किस्सा

बनावट आधार कार्डाच्या आधारे प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसह अमृत ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली.

पुढारी वृत्तसेवा

The number of Amrut seniors, including seniors traveling on the basis of fake Aadhaar cards, has decreased significantly.

जे.ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नुकतेच एसटी महामंडळाने मार्ग तपासणी मोहीम राबवली. यात अनेकांकडे बनावट आधार आढळून आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता आधार कार्ड सरकार स्कॅन करणार आहे. ते बनावट आढळल्यास आतापर्यंतच्या प्रवासांच्या खर्चाचा बोजा ७/१२ वर टाकणार असल्याची हवा केली. याचा परिणाम असा झाली की बनावट आधार कार्डाच्या आधारे प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसह अमृत ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली.

एसटी महामंडळाने १५ ते १८ जुलै दरम्यान मार्ग तपासणी मोहीम राबवली. यात महिला सन्मान योजना, ज्येष्ठ, अमृत ज्येष्ट, दिव्यांग तसेच विद्यार्थी पासेसच्या प्रवाशांची तपासणी केली. या योजनांचा लाभ घेण्यासाठी काहीजण बनावट आधार कार्डासह दिव्यांगांच्या प्रमाणपत्राचा आधार घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे १५ ते १८ जुलै दरम्यान ही विशेष मोहीम हाती घेतली होती.

तपासणीत पहिल्याच दिवशी अनेकांनी बनावट आधार कार्डाच्या आधारे ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठ योजनेचा तसेच बनावट प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांग योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले. या पथकाने अनेकांवर कारवाई केली. दरम्यान आधार कार्डावरील जन्म तारीख पाहून तिकीट देण्याच्या सूचना असल्यामुळे वाहक कार्डाच्या आधारे तिकीट देण्याचे काम करतात. नेमका याचाच गैरफायदा घेत बनावट आधार कार्ड बनवून अनेक जण योजनांचा लाभ घेत असल्याचे या तपासणीदरम्यान समोर आले.

अचानक संख्या घटली

अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी केलेल्या हवा हवाईचा परिणाम तपासणी दरम्यान आढळून आला. प्रत्येक मार्गावर ७० टक्के प्रवासी विविध योजनेतून प्रवास करत होते. परंतु पहिल्या दिवशी केलेल्या प्रयोगामुळे बनावट ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून आले. तर अनेकांना प्रवासासाठी बनवलेल्या आधारा कार्डचे आता करायचे काय असा प्रश्न सतावत आहे.

अर्ध्यातून प्रवास रह दरम्यान यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून तपासणी अधिकाऱ्यांची आता ज्येष्ठ, अमृत ज्येष्ठांच्या आधार कार्डाचे तसेच दिव्यांगांच्या प्रमाणपत्राचे सरकार स्कॅनिंग करणार आहे. ते बनावट आढळल्यास योजना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतच्या प्रवासाच्या तिकिटाचा बोजा ७/१२ वर टाकणार असल्याचे सांगितले. हे ऐकून बनावट आधार कार्डवाल्याचे धाबे दणाणले. अनेकांनी अर्ध्यावरच प्रवास थांबवला तर अनेकांनी दुसर्या दिवशीपासून प्रवास करणेच टाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT