Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेट Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

महापौर पदाच्या निवडणुकीसाठी मनपा देणार विभागीय आयुक्तांना प्रस्ताव

महापौर पदाची आरक्षण सोडत गुरुवारी सकाळी मुंबईत पार पडली. यात छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून या सोडतीनंतर लागलीच महापालिकेतही हालचालींना वेग आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

The municipal corporation will submit a proposal to the divisional commissioner for the mayoral election

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापौर पदाची आरक्षण सोडत गुरुवारी सकाळी मुंबईत पार पडली. यात छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून या सोडतीनंतर लागलीच महापालिकेतही हालचालींना वेग आला आहे. महापौर उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत हे विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणार असून त्यानंतर ही निवडणूक केव्हा घ्यायची याबाबत विभागीय आयुक्त निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यावर या पदासाठी निवडणूक केव्हा घेतली जाणार याबद्दल आता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचहली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोडतीबाबतचे अधिकृत पत्र शासनाकडून प्राप्त झाल्यावर महापालिका विभागीय आयुक्तांना महापौरपदाची निवडणूक घेण्याबद्दल प्रस्ताव पाठवेल. त्यामुळे रात्री उशिराने हे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्यास आज (दि. २३) प्रशासक जी. श्रीकांत हे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना महापौर निवडणुकीबाबत प्रस्ताव पाठवतील, अशी शक्यता आहे.

विभागीय आयुक्त महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करतील आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करतील. सर्वसाधारण-पणे महापौर निवडीच्या सभेसाठी आठ दिवस अगोदर नोटीस काढली जाते. दरम्यान, सध्या जिल्हा परिषद निवडणूक सुरू असल्याने त्याच्या निकालानंतरच महापौर निवडीची प्रक्रिया होईल, अशी देखील शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT