The MASIA Advantage Maharashtra Expo will be inauguration today.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मसिआ अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२६ हे ९ वे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गुरुवारी (दि.८) ऑरिक डीएमआयसी शेंद्रा येथे होत आहे. ११ तारखेपर्यंत चालणाऱ्या या एक्सपोत देश-विदेशांतील कंपन्या, उद्योजकांचे शिष्टमंडळ सहभागी होणार असल्याने राज्यासह मराठवाड्यातील औद्योगिक विकासास मोठी चालना मिळणार आहे.
ऑरिक सिटी येथील ५८ एकर परिसरात १५०० स्टॉल्सव्दारे राज्यासह देशातील मोठे उद्योग आणि काही आंतरराष्ट्रीय-बहुराष्ट्रीय उद्योग आणि स्थानिक व मसिआचे सदस्य उद्योग यामध्ये सहभागी होणार आहेत. मराठवाडा विभागातील औद्योगिक संधींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे, स्थानिक उद्य- ोजक, महिला उद्योजक व नवउद्योजक यांना नवीन गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे, निर्यातक्षम उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे तसेच बेर- ोजगारांसाठी उद्योगाच्या तसेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा व येथील स्थानिक उद्योग-व्यापार, कृषी व पारंपरिक कला आदी वृद्धिंगत व्हावी यासाठी हे औद्योगिक प्रदर्शन उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जवळपास ३ लाख प्रदर्शक अपेक्षित असून, केंद्र तसेच राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्री तसेच सचिवांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. या औद्योगिक प्रदर्शनात जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, उद्योग, व्यापार, व्यवसाय, सेवा क्षेत्रातील कार्यरत असलेल्या सर्वांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्ष अर्जुन गायकवाड, संयोजक अनिल पाटील, चेतन राऊत यांच्यासह उपाध्यक्ष राहुल मोगले, मनीष अग्रवाल, सचिव सचिन गायके, राजेंद्र चौधरी यांनी केले आहे.
देशभरातील उद्योगांचा सहभाग
१५०० स्टॉल्सव्दारे राज्यासह देशातील मोठे उद्योग आणि काही आंतरराष्ट्रीय-बहुराष्ट्रीय उद्योग आणि स्थानिक व मसिआचे सदस्य उद्योग या औद्योगिक प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.