Vote Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Municipal election : मनपाची आजपासून रणधुमाळी, निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

युती, आघाडीचे मात्र ठरेना

पुढारी वृत्तसेवा

The filing of nomination papers for the election begins today.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या रणधुमाळीला मंगळवार (दि.२३) पासून खरी सुरुवात होत आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज वितरणासह भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तयारी ३० डिसेंबर राहणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर व नदिड या महापालिकांसाठी निवडणुका होत आहे. एकीकडे अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर दुसरीकडे अद्याप युती, आघाडीचा फार्मूलाच ठरत नसल्याने इच्छुक उमेदवार मात्र कमालीचे चिंतेत आहे.

मराठवाड्यात अनेक वर्षांनंतर महापालिकेच्या निवडणुका होत आहे. विशेष म्हणजे या निवडणुका प्रभागनिहाय होत असल्याने वेगळीच उत्सुकता लागून आहे. या पाचही महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर मतदार यादी अंतिम करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहे. मनपाच्या झोन कार्यालयांसह इतर ठिकाणी निवडणुक कार्यालये सुरू करण्यात आले आहेत. या कार्यालयांसाठी स्टेशनरी पुरविण्यात आली. झोन कार्यालयाचे सर्व कर्मचारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेले कर्मचारी निवडणुकीचे काम करतील. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. शासकीय सुटी वगळून (रविवारसह) ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्जाची स्वीकृती होणार आहे.

युती, आघाडीचा तिढा सुटेना

मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरू होत असली तरी अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि नांदेड या पाचही ठिकाणी महायुती आणि आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे, युती, आघाडी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने इच्छुक उमेदवारामध्ये घालमेल वाढली आहे.

खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार रुपये डिपॉझिट

मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार रुपये, तर महिला व राखीव उमेदवारासाठी २५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. तर उमेदवारी अर्जासाठी शंभर रुपये शुल्क आणि त्यासोबत निवडणुकीची माहिती पुस्तिका असून, त्याचे वेगळे शंभर रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ३०० अर्ज देण्यात आले आहेत.

मनसे - शिवसेना युतीची घोषणा वाजत-गाजत करणार : राऊत मुंबई: देशात, महाराष्ट्रात बुरंधर कोण हे भाजप नाही तर जनता ठरवेल. कारण बिहारमध्ये झाले, तेच काल नगरपालिका निवडणुकीत झाले, अशी टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नगरपालिका निवडणुकांची तुलना बिहारच्या निकालाशी केली, दरम्यान, दोन भावांची युती, मनोमिलन झाले आहे. मुंबईसह ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली आदी महापालिकांची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा ही वाजत-गाजत केली जाईल, असे राऊत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT