The district recorded an average voter turnout of 70 percent; the counting of votes will take place tomorrow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेचे ६३ गट व पंचायत समितीच्या १२६ गणांमधील सदस्य निवडणीसाठी शनिवारी (दि.७) सरासरी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र दिवसभरात काही ठिकाणी वाद, गोंधळ, धक्काबुक्की आणि आरोपांचे प्रकार पहायला मिळाले. यासोबतच निवडणूक रिंगणात असलेल्या तब्बल ८३० उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. दिवसभरात सरासरी ७० टक्के मतदान झाले असून सोमवारी (दि.९) मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे.
सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र थंडीमुळे मतदानाची गती हळू होती. मात्र साडेदहानंतर मतदानाने वेग घेत दिवसभरात ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांसमोर रांगा असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदानाची अधिकृत आकडेवारी समोर आली नाही.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सावंगी-हसूल, तसेच फुलंब्री तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तर पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदीपान भुमरे, आदींनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. दरम्यान, मतदान केंद्रांवर महसूल कर्मचा-यांसह पोलिसांची कुमक तसेच गृह रक्षक दलाच्या जवानांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान गेल्या २० दिवसांपासून उमेदवारांची सुरू असलेली धावपळ अखेर शनिवारी मतदान पार पडताच थांबली. मात्र आता सर्वांचे लक्ष ९ फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
एक-दोन ठिकाणच्या मशीन बदललेल्या, मतदान शांततेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती 66 निवडणूक सुरू असताना एक दोन ठिकाणी मशीन बदलल्या असून या व्यतिरिक्त अनुचित प्रकार घडला नाही. एक-दोन ठिकाणच्या अफवा आम्हाला ऐकायला मिळाली असता आम्ही त्या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांना सूचित करून पाठवले.- दिलीप स्वामी जिल्हाधिकारी
वाळूजमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
औद्योगिक नगरी बाळूज परिसरातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये 1 तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे समोर आले. मशीन बंद पडणे, मत नोंद न होण्याच्या तक्रारी यामुळे मतदारांमध्ये असंतोष दिसून आला. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरू ठेवल्याचे प्रक्रिया पुढे सुरळीत सुरू झाली.
वादावादी, शाब्दिक चकमक !
जिल्हात काही ठिकाणी पोलिस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक पहायला मिळाली. बिडकीन मतदान केंद्रावर विनाकाम गर्दी करत ८२ महिला गर्दी करत असल्याचे पोलिसांनीता होता. नानेगाव येथे शिवसेनेच्या कार्यकत्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
बोगस मतदान झाल्याचे व्हिडीओ व्हायरल !
जिल्ह्यातील काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले. एका केंद्रावर एक तरुण बोगस मतदान करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला. नागरीकांनी बोगस मतदाराला मारहाण केल्याचेही समोर आले. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बोगस मतदानाचा आरोप केला. एका उमेदवाराने बसेस भरून आणल्या असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.