Sambhajinagar Crime News : मिरवणुकीत चाकू नाचविणाऱ्या नशेखोर गुन्हेगाराचा पोलिसावर घाव  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : मिरवणुकीत चाकू नाचविणाऱ्या नशेखोर गुन्हेगाराचा पोलिसावर घाव

पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांशी झटापट

पुढारी वृत्तसेवा

The criminal attacked the police with a knife while being arrested.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत नशेत धुंद होऊन चाकू नाचविणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पकडताना त्याने पोलिसांशी झटपट करून चाकूहल्ला चढविला. यात अंमलदाराच्या हाताला घाव लागून जखमी झाले. हा प्रकार शुक्रवारी (दि.१) रात्री आठच्या सुमारास उस्मानपुरा भागातील अण्णा भाऊ साठे चौकात घडला. आकाश ऊर्फ गयब्या राजू खरे (रा. मिलिंदनगर) असे आरोपीचे नाव असून, त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, शुक्रवारी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उस्मानपुरा भागात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी झाले होते. मिरवणूक सुरू असताना सराईत गुन्हेगार आकाश खरे हा चाकू घेऊन मिरवणूक शिरला. चाकू नाचवत असल्याचे दिसताच बंदोबस्तावरील उपनिरीक्षक गोरे, सहायक फौजदार जगताप, अंमलदार प्रकाश भालेराव, ढवळे यांनी त्याच्याकडे धाव घेतली.

तेव्हा आरोपी खरे याने उपनिरीक्षक गोरे यांच्याशी अरेरावी करत झटपट केली. त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेताना तो अंमलदार भालेराव यांच्या अंगावर चाकू घेऊन धावून आला. त्याने भालेराव यांच्या गळ्याच्या डाव्या बाजूला वार केला. मात्र, तो हातावर झेलल्याने भालेराव हे जखमी झाले. खरे याला पोलिसांनी पकडून ठाण्यात आणले. पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाकडून शाळेसाठी राबवण्यात येणार्या योजनांचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र केवळ २८ हजारांच्या वीज बिल थकबाकीमुळे सिडको एन-७शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळेचे वीज बिल फेब्रुवारीपासून थकीत असल्याने महावितरण कंपनीने १८ जुलै रोजी या शाळेचा वीज पुरवठा खंडित केला आहे.

त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून शाळेतील नियमित संगणक वर्गही बंद आहेत. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान शाळेच्या नवीन इमारतीचे काम एका खासगी कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे कामासाठी लागणारी वीज नसल्याने बांधकाम ठप्प झाले आहे. यावरून मनपा शिक्षण विभागाचा गलथानपणा समोर आला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांशी झटापट

खरे याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. मात्र, खरे याने पोलिस निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक गोरे, अंमलदार सुरेवाड यांच्याशी झटापट करून चांगलाच गोंधळ घातला. सुरेवाड यांना मारहाण करून जखमी केले. खरे याने लोखंडी गेटवर, भिंतीवर स्वतःचे डोके आपटून घेत फोडून घेतले. मी तुम्हाला सर्व पोलिसांना कामाला लागतो, असे म्हणत पोलिसांनाच धमकावले. त्याच्याकडून १३ इंचाचा चाकू जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT