गण गण गणात बोते...! च्या गजरात शहर भक्तिमय file photo
छत्रपती संभाजीनगर

गण गण गणात बोते...! च्या गजरात शहर भक्तिमय

श्री गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात, भक्तांची मांदियाळी !

पुढारी वृत्तसेवा

The city was filled with devotion amidst the chants of "Gan Gan Ganat Bote...!"

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज यांचा १४८ वा प्रकट दिन सोहळा रविवारी (दि.८) मोठ्या उत्साहात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्त पहाटे ४ वाजता ब्रह्मवृंदांच्या हस्ते श्रींच्या अमृताभिषेक पूजनाने सोहळ्याला सुरुवात झाली. गारखेडा परिसरातील मंदिराचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून गेला निघाला. तर गण गण गणांत बोतेने शहर परिसर भक्तिमय झाला.

प्रकटदिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीगजानन महाराज (शेगाव) मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने १ फेब्रुवारीपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा वाचन, श्रीगजानन विजय ग्रंथ सामुदायिक पारायण, हरिकीर्तनासह प्रकटदित महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने साजरे झाले, अशी माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण वक्ते यांनी दिली. ब्रह्मवृंदांच्या अमृताभिषेकांनंतर सकाळी ७ वाजता श्रींची सामूहिक आरती करण्यात आली.

दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांना कोणतीही अडचण नाही याची काळजी घेतली जात होती. स्वयंसेवकाची मोठी टीम यासाठी कार्यरत होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी दर्शनासाठी कायम होती.

प्रकटदिन सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासून सुरू असलेल्या गणेश यागाची पूर्णाहूती रविवारी पार पडली. सकाळी ११ वाजेपासून महाप्रसाद वाटपाला प्रारंभझाला. कडा मैदानातील भव्य मंडपात श्रींचा अखंड नामजप सोहळा पार पडला. हा उत्सव यंदाच्या या प्रकटदिन सोहळ्याचे वे-गळेपण होते.

या नामजप उत्सवात हजारो भक्तांनी सहभाग नोंदवून पुण्यफल प्राप्ती करून घेतल्याचे डॉ. प्रवीण वक्ते यांनी सांगितले. गारखेडा परिसरासह शहर परिसरातील विविध ठिकाणी आयोजित प्रकट दिनानिमित्त रविवारी रात्री उशिरापर्यंत भक्तगणांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.

काल्याच्या कीर्तनाने सांगता

सायंकाळी बार्शी येथील अनिल महाराज पाटील यांचे हरिसंकीर्तन झाले. सोमवारी सकाळी १० वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे १३ वे वंशज श्रीक्षेत्र पंढरपूर येथील कान्होबा महाराज देहूकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने प्रकटदिन सोहळ्याची यशस्वी सांगता होईल, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT