गोवंश तस्करांची कार उलटली, तिघे जखमी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Cattle Smuggling : गोवंश तस्करांची कार उलटली, तिघे जखमी

पोलिसांचा थरारक पाठलाग : महानुभाव आश्रम चौकातील पहाटेची घटना

पुढारी वृत्तसेवा

The cattle smugglers' car overturned, three were injured

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिसांची नाकाबंदी भेदून गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका कारचा थरारक पाठलाग करण्यात आला. द पोलिसांना चकवा देऊन पळणाऱ्या भरधाव होंडा सिटी की कारचा महानुभव आश्रम चौकात दुभाजकाला धडकून वो भीषण अपघात झाला.

या अपघातात कारमधील तीन न तस्कर गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी कारमधून न दोन गायींची सुटका केली. ही घटना शुक्रवारी (दि.२३) न पहाटे ५ वाजता घडली. अपघातात कारचा चेंदामेंदा . झाला आहे. अमजद अहमद कुरेशी (रा. पडेगाव), अजहर अल्ताफ कुरेशी (३५, रा. पैठण गेट) आणि शेख मोसीन शेख रफिक (रा. शहानूरमियाँ दर्गा), अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक द कृष्णा शिंदे यांनी दिली.

शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सातारा ल पोलिस ठाण्याचे कर्मचारी संताजी चौकीसमोर नाकाबंदी ड करून वाहनांची तपासणी करत होते. यावेळी पैठणकडून शहराकडे येणाऱ्या होंडा सिटी कारला (क्र. एम एच-. ४३-ए-६४५६) पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता ती भरधाव वेगाने

नाकाबंदी तोडून पुढे नेली. त्याच्यामागे एक एर्टिगा कारही सुसाट गेल्याने पोलिसांच्या एका पथकाने तातडीने दोन्ही वाहनाचा पाठलाग सुरू केला. पाठलागादरम्यान, महानुभव आश्रम चौकात नियंत्रण सुटल्याने ही कार जोरात दुभाजकाला (डिव्हायडर) धडकली आणि उलटली. या भीषण अपघातात कारमधील अमजद कुरेशी, अजहर कुरेशी आणि शेख मोसिन हे तिघेही जखमी झाले. अमजद कुरेशी हा गंभीर जखमी झाल्याने रुग्णवाहिकेतून त्याला पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अंमलदार देवचंद ब्रह्मनाथ यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.

गोरक्षक करत होते कारचा पाठलाग

होंडा सिटी कारच्या मागे इर्टिगा कार धावत होती ती गोरक्षकांची होती. होंडा सिटी कारमधून कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे ते पाठलाग करीत होते, असे समोर आले. पोलिस अपघातस्थळी दाखल झाले तेव्हा इटिंगा कारमधील अमित सिंग, सुजीत राजपूत आणि गणेश शेळके हे तिघेही तेथे होते. त्यांनी दोन्ही गायींना कारच्या बाहेर काढले होते. सर्व प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला.

क्रूरपणे कोंबले होते गोवंश

पोलिसांनी कारची झडती घेतली असता, मागील सीटच्या मागे आणि डिक्कीमध्ये दोन गायी अत्यंत क्रूरपणे आणि दाटीवाटीने कोंबलेल्या अवस्थेत आढळल्या. यामध्ये एक काळ्या रंगाची आणि एक लाल रंगाची गाय होती, ज्यांची अंदाजे किंमत ५०,००० रुपये आहे. प्राथमिक चौकशीत हे गोवंश शेवगाव येथून कत्तलीसाठी आणल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT