The 23 builders against whom MHADA has filed complaints are now on the Crime Branch's radar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या नियमांना हरताळ फासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या ८१४ सदनिका आणि तब्बल ७१ हजार १३४ चौरस मीटर विकसित भूखंड परस्पर हडप करणाऱ्या शहरातील २३ बड्या बिल्डरांवरील कारवाईच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे.
म्हाडाचे मुख्य अधिकारी वैभव केदारे यांनी पाठवलेल्या तक्रार अर्जाची पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची सखोल प्राथमिक चौकशी थेट गुन्हे शाखेकडे सोपवली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्याकडे हा तपास देण्यात आला असून, पोलिसांनी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारीत नमूद सर्व बिल्डरांच्या मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष हजर राहण्याचे कळविले आहे.
म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा विभागाच्या अहवालानंतर पोलिस आयुक्तांकडे हे पत्र वर्ग करण्यात आले होते. पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली आहेत. गुन्हे शाखेने म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातील संबंधित नगररचना व गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले आहे.
संबंधित २३ विकासकांनी नगररचना विभागाकडून ले आउट मंजूर करताना शासनाला दिलेली हमीपत्रे, यूडीसीपीआर २०२० च्या नियम ३.८.२ नुसार २० टक्के सदनिका व भूखंड म्हाडाला हस्तांतरित न करता परस्पर ग्राहकांना कसे विकले, रेरा नोंदणीमध्ये काय माहिती दर्शवली, याचे सर्व अधिकृत दस्तऐवज पोलिस तपासणार आहेत. या कागदपत्रांच्या तांत्रिक व कायदेशीर पडताळणीनंतर म्हाडाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून पोलिस ठाण्यात रीतसर सविस्तर फिर्याद नोंदवून फसवणूक, विश्वासघात आणि अपहाराचे गंभीर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
सदनिका न देणारे प्रकल्प
मे. नमो रिअल्टीतर्फे भागीदार अमीन अब्दुला
१ सुराणी व कमरुद्दीन करीम भारवाणी (गट क्र. १३७ भाग, सातारा - २३ सदनिका)
दिलीपकुमार रमणलालजी बाकलीवाल व इतर
(गट क्र. ३९ भाग, सातारा - १०८ सदनिका)
सम्यक निवास हक्क संघ, प्रयोजक भिम फाऊं-
३ डेशनतर्फे अध्यक्ष मधुकर विठ्ठल सूर्यवंशी व इतर (गट क्र. ११/२, भावसिंगपुरा - ३६ सदनिका)
त्रिलोकसिंग तारासिंग जबिंदा (गट क्र. २६/पैकी,
४ शहानूरवाडी, मौजे सातारा - २८ सदनिका)
मे. पीयूष इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लि. तर्फे प्रल्हाद
५ हरीराम पन्हाळे (गट क्र. २३ व २५/० नूरवाडी - १२ सदनिका)