Graduate Constituency Election : मराठवाड्यात पदवीधरसाठी ५८.६७ टक्के मतदान

१ लाख ९१,६८९ मतदारांनी बजावला हक्क : धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक मतदान
Graduate Constituency Election
Graduate Constituency Election : मराठवाड्यात पदवीधरसाठी ५८.६७ टक्के मतदानfile photo
Published on: 
Updated on: 

58.67 percent voter turnout for graduates in Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान ८४२ मतदान केंद्रांवर अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यात ४१ उमेदवारांसाठी मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातील ३ लाख २६ हजार ७०० मतदारांपैकी १ लाख ९१,६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Graduate Constituency Election
Sambhajinagar Crime News : मिटमिटा भागात घर फोडून २.८० लाखांची रोकड अन् ३ तोळे सोने लंपास

मतदानाची ही टक्केवारी ५८.६७ इतकी आहे. सर्वाधिक मतदान ६२.५३ टक्के मतदान धाराशिव जिल्ह्यात झाले तर सर्वात कमी ५५.७३ टक्के मतदान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाले. या निवडणुकीची मतमोजणी येत्या २७ ऑक्टोबरला चिकलठाणा एमआयडीसीत होणार आहे. दरम्यान, गेल्यावेळी ६४.७९ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदान सरासरी ६ टक्क्यांनी घटले.

मराठवाडा पदवीधर संघात उमेदवारांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बॅलेट पेपरचा आकारही गेल्यावेळपेक्षा जास्त मोठा होता. तब्बल ४१ उमेदवार या बॅलेट पेपरवर बसविण्यात आले होते. सकाळी ८ वाजता मराठवाड्यातील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात प्रत्येक केंद्रांवर अगदी एक-दोनच्या संख्येने मतदार येतांना दिसून आले. त्यामुळे पहिल्या २ तासांच्या सत्रात विभागात ६.५२ टक्के मतदान नोंद झाली होती. त्यानंतर सकाळी १० ते १२ या दोन तासात मतदानाचा टक्का वाढला. अन् ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी २०.८४ वर पोहचली होती.

Graduate Constituency Election
Marathwada Historical Drought | दुष्काळ : इतिहासाच्या पानांतून

दरम्यान, दुपारी १२ वाजेनंतर मतदानाच्या टक्केवारीला आणखीच वेग आला. ३६.०२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात ३८.४३ टक्के पुरुष आणि २८.३२ टक्के महिला व (१.६९ इतर मतदारांचा समावेश होता विभागात शेवटच्या दोन तासांत बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांनी हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे या मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्यामले मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा एकत्रित मतदानाचा आकडा प्रशासनाला रात्री उशिरा प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

२७ ऑक्टोबरला मतमोजणी

मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष येत्या मंगळवारी (दि. २७) होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. चिकलठाणा एमआयडीसीतीहल वुडस्टर्म डेकार कंपनीच्या परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून यासाठी ४४५५ अधिकारी- कर्मचारी नियुक्त केले आहेत.

४१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

मराठवाडा पदवीधर मतदार संघात यंदा तब्बल ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदार संघात हॅट्रिक करणारे राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार गटाचे) सतीश चव्हाण हे चौथ्यांदा रिंगणात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news