Terrible car accident on Samruddhi Highway, woman killed on the spot
वैजापूर : नितीन थोरात
समृद्धी महामार्गावर वैजापूर शहरालगत असणाऱ्या डवळा शिवारात आज (मंगळवार) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर एका पुरूषाचा उपचारा साठी घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर तिघा चिमुकल्यांसह चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिकहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना कारला पाठिमागून अज्ञान वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाली आहे. या भीषण अपघातात पूनम चव्हाण (वय 30) तर देवानंद चव्हाण (21) या दाेघांचा मृत्यू झाला आहे. तर अजयकुमार चव्हाण (38), नॅन्सी चव्हाण (8), अनन्या चव्हाण (5) आणि पियानसी (6) हे चारजण जखमी झाले आहेत.
या अपघातात जखमींमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. अन् त्यांच्या आईचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कारला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
या अपघातात तीन चिमुकल्या मुलांच्या आईचा मृत्यू झाल्याने ही तीन्ही चिमुरडी आईच्या मायेपासून पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी रडणाऱ्या चिमुरड्या पोरांना पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले.