Teachers' spontaneous school closure protest
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शहर आणि तालुक्यातील सर्व शाळांनी शासनाने लादलेल्या जाचक अटी व प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ १००% टक्के शाळाबंद आंदोलन केले. यावेळी संस्थाचालक सागर जाधव आणि सर्व शिक्षकांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांनाही स्वतंत्र निवेदन देण्यात आले.
२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी टीईटीची सक्ती रद्द करावी. या संदर्भात शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी व पुनर्विचार याचिका दाखल करावी. कलम २३ अंतर्गत शिक्षकांसाठी करण्यात आलेल्या नियमांमध्ये सुधारणा कराव्यात. विद्यार्थी संख्या निर्बंधाबाबत १५ मार्च २०२४ चा संच मान्यता निर्णय रद्द करावा. जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करावी आदी मागण्या शिक्षकांनी मांडल्या.
प्रलंबित मागण्यांसाठी शाळांनी शैक्षणिक कामकाज बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी संजय जाधव, रवींद्र नीळ, राकेश निकम, सुनिता दळवी, जयश्री सोनार, मीनाक्षी पवार, गणेश विसपुते, प्रशांत शिंदे, प्रदीप सनंसे, सचिन भामरे, बाळासाहेब निकम, अनिल एडके, आजिनाथ जाधव, उल्केश वाळुंजे, सोपान काळे, बाबासाहेब सपकाळ, राजू पाडवी, लखन शिंदे, मंगेश गायकवाड, हर्षदा कदम, अलका जाधव यांच्यासह अन्य बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.