TCS Nida Khan Arrest pudhari
छत्रपती संभाजीनगर

TCS Nida Khan Arrest: राजकारण तापलं! निदा खानला इम्तियाज जलील यांचा पाठिंबा... शिरसाटांचा गंभीर आरोप

Anirudha Sankpal

TCS Nida Khan Arrest Politics: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारी निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातील कैसर कॉलनी (कळसर पार्क) येथील एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. नाशिक आणि संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला ताब्यात घेतले.

अटकेचा थरार आणि पोलिसांचा सापळा

कुटुंबासह वास्तव्य: निदा खान गेल्या ४ ते ६ दिवसांपासून नरेगाव येथील एका भाड्याच्या घरात तिचे आई-वडील, भाऊ आणि मावशी यांच्यासह राहत होती.

गोपनीयता: निदा खान घराबाहेर येणे पूर्णपणे टाळत होती. घरातून कोणीही बाहेर पडत नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

पोलिसांची पाळत: नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे गेल्या दोन दिवसांपासून संबंधित फ्लॅटवर पाळत ठेवली होती.

मध्यरात्री छापा: निदा खान तिथेच असल्याची खात्री पटताच मध्यरात्री नाशिक पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून तिला ताब्यात घेतले.

न्यायालयीन कारवाई

अटकेनंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधील न्यायाधीशांसमोर हजर केले. न्यायालयाने निदा खानचा ट्रान्झिट रिमांड (Transit Remand) मंजूर केल्यानंतर, नाशिक पोलिसांचे पथक तिला घेऊन नाशिककडे रवाना झाले आहे.

संजय शिरसाटांचा इमतियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप

निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. आमदार संजय शिरसाट यांनी या प्रकरणी एमआयएमचे (MIM) माजी खासदार इमतियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

एसआयटी चौकशीची मागणी: इमतियाज जलील यांनी निदा खानला पाठिंबा दिला असून, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.

मोठं षडयंत्र: "निदा खान ही केवळ एक मोहरा असून याचे मास्टरमाइंड समोर आले पाहिजेत," असे म्हणत शिरसाट यांनी यामागे मोठे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट: या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

या अटकेमुळे टीसीएस धर्मांतर प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT