TCS Conversion Nida Khan Arrest: टीप मिळाली; दोन दिवस पाळत... अन् मास्टर माईंड निदा खान अडकली पोलिसांच्या जाळ्यात

TCS Conversion Nida Khan Arrest
TCS Conversion Nida Khan Arrestpudhari
Published on
Updated on

TCS Conversion Nida Khan Arrest: नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला नाशिक पोलिसांनी गुरूवारी अटक केली. निदा खानवर टीसीएसमधील कर्मचाऱ्यांवर बळजबरी धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

TCS Conversion Nida Khan Arrest
TCS Nashik Case| निदा खानचा जामीन अर्ज फेटाळला

निदा खानला अशी झाली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निदा खान ही गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजी नगर मधील नरेगाव भागातील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये रहात असल्याची माहिती मिळाली होती. ती तिचे पालक आणि भावासोबत या फ्लॅटमध्ये रहात होती.

पोलिसांनी सांगितलं की आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही गेल्या दोन दिवसांपासून या फ्लॅटवर पाळत ठेवून होतो. त्यानंतर निदा खानला अटक करण्याचे ऑपरेशन लाँच करण्यात आलं. हे ऑपरेशन नाशिक एसआयटी आणि छत्रपती संभाजी नगर पोलीस क्राईम ब्रांच यांनी संयुक्तरित्या राबवलं.

TCS Conversion Nida Khan Arrest
Nida Khan Pregnant: मी गरोदर आहे... TCS धर्मांतरण प्रकरणातील 'फरार' आरोपी HR निदा खानची जामीनासाठी कोर्टात धाव

पोलिस काय म्हणाले

निदा खानच्या अटकेनंतर एसआयटीने अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं. ते आपल्या वक्तव्यात म्हणतात, ' देवळाली पोलीस स्टेशन क्राईम रजिस्टर नंबर १५६/२६ मधील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजी नगरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. भारतीय न्याय संहिता कलम ४३(५) अंतर्गत तिला छत्रपती संभाजी नगर न्यायदंडाधिकाऱ्यांसोर उपस्थित करण्यात आलं. त्यानंतर पुढील नाशिकमधील कारवाईसाठी ट्रांझीट रिमांड मागण्यात आला होता. पोलिसांना तिचा ट्रांझीट रिमांड मिळाला आहे. यानंतर तिला पुढील तपास आणि कायदेशीर बाबींसाठी नाशिकला नेण्यात आलं आहे.

TCS Conversion Nida Khan Arrest
TCS Nashik Harassment | "मूल हवे असेल तर पत्नीला माझ्याकडे पाठव"; नाशिक टीसीएस प्रकरणात नराधम आरोपीचा धक्कादायक खुलासा

निदा खानने यापूर्वी नाशिक कोर्टात तिला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून याचिका केली होती. तिने ती दोन महिन्याची गरोदर असल्याचं कारण दिलं होतं. मात्र न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन देण्याचं नाकारलं. निदा खानने डिसेंबर २०२१ मध्ये टीसीएस जॉईन केलं होतं. ती प्रोसेस असिस्टंट म्हणून काम करत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news