सुरतहून नशेच्या गोळ्या, सिरप तस्करीचा डाव टास्क फोर्सने उधळला  file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : सुरतहून नशेच्या गोळ्या, सिरप तस्करीचा डाव टास्क फोर्सने उधळला

तस्कर झाला पसार, २ हजार गोळ्या, ११८ सिरप बाटल्या जप्त

पुढारी वृत्तसेवा

Task Force Foils Plot to Smuggle Narcotic Pills and Syrups from Surat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रवाशाचा बनाव रचून सॅकमध्ये ब्लॅकेटच्या खाली लपवून नशेच्या गोळ्या आणि सिरपची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा डाव अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) शनिवारी (दि.२१) पहाटे उधळून लावला. नगर नाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी तब्बल २ हजार नशेच्या गोळ्या, ११८ सिरप बाटल्या असा ९ लाखांचा साठा जप्त केला. कारवाईदरम्यान पोलिसांशी झटापट करत आरोपीने अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. या कारवाईमुळे शहरात गुजरातहून ड्रग्ज तस्करीचे रॅकेट पुन्हा सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

सय्यद अझर सय्यद अकबर (रा. चांदमारी, छावणी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती एएनटीएफचे उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली. एएनटीएफच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना या तस्करीची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी सापळाचे नियोजन त्यानुसार, टास्क फोर्सने पहाटे ४:४५ वाजेपासूनच नगर नाका परिसरात सापळा लावला होता.

सकाळी ६:०५ वाजता ट्रॅव्हल्समधून अझर खाली उतरताच पोलिसांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाहूल लागताच त्याने स्वतःची सॅक आणि चपला भररस्त्यात फेकून देत पोलिसांशी झटापट केली. त्यानंतर रस्ता दुभाजकावरून उड्या मारत आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा तसेच पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत त्याने पळ काढला. याप्रकरणी हवालदार नितीन जाधव यांच्या फिर्यादीवरून पसार आरोपी सय्यद अझर विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस त्याच्या मागावर आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजित टिके, उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गीता बागवडे, एपीआय दीपाली पाटील, सफौ विश्वास शिंदे, नितीन जाधव, हरीश मुंढे, अतुल तुपे, राहुल काळे, ज्योती कीर्तिकर, आम्रपाली सूर्यवंशी, प्रियांका पवार यांच्या पथकाने केली. बॅच नंबरवर फिरवला काळा मार्कर आरोपी अझरने प्रत्येक सिरपच्या बाटलीवरील बॅच नंबर काळ्या मार्करने जाणीवपूर्वक खोडून काढला होता. बॅच नंबरवरून हा साठा कोणत्या कंपनीत तयार झाला, तो कोणत्या वितरकाला विकला गेला आणि सुरतमध्ये अझरला तो नेमका कोणी पुरवला, याची साखळी शोधणे पोलिसांना सोपे जाते. मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत आणि पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने आरोपीने ही चलाखी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आठ दिवसाला सुरतवारी छावणी परिसरातील चांदमारी भागात राहणारा सय्यद अझर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्-हेगार आहे. शहरातील तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढण्यासाठी तो दर आठ दिवसाला गुजरात राज्यातील सुरत गाठायचा. तेथून मुसाफिर ट्रॅव्हल्सने अमली पदार्थांची मोठी खेप घेऊन तो शहरात येत असे.

सॅकमध्ये ब्लँकेट खाली लपविला माल

प्रवासात पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आणि सहप्रवाशांना संशय येऊ नये म्हणून त्याने शक्कल लढवली होती. आपल्या सॅकमध्ये त्याने सर्वात वर बसमधील पिवळ्या रंगाचे ब्लँकेट आणि टॉवेल ठेवले होते, तर त्याखाली तब्बल २००० अमली गोळ्या आणि ११८ नशेच्या सिरपच्या बाटल्या दडवून ठेवल्या होत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT