Survey of Dharashiv, Sambhajinagar, Chalisgaon railway line
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, चाळीसगाव या रेल्वे मार्गाचा हेलिकॉप्टरद्वारे दोन दिवस लीडर सर्व्हे करण्यात आले. या सव्र्व्हेचे काम हैदराबाद येथील आर्वी इंजिनियरिंग कन्सल्टन्सीने पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, चाळीसगाव हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या मार्गाच्या सव्र्व्हेला नुकताच मुहूर्त लागला असून हैदराबाद येथील आर्वी इंजिनियरिंग कन्सल्टन्सीने या मार्गाचे हेलिकॉप्टरद्वारे लीडर सर्व्हे केला आहे.
या रेल्वे मार्गामुळे मालवाहतूक कमी खर्चात आणि कमी वेळात होणार आहे. या मार्गामुळे मराठवाड्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. धुळे- येडशी रस्ते महामार्गाला समांतर असा हा रेल्वे मार्ग ठरणार आहे. या मार्गामुळे धाराशिव, संभाजीनगर, बीड, कन्नड, चाळीसगाव ठिकाणी वेळेत आणि कमी येथील शेतकऱ्यांचा माल ही विविध खर्चात दिली. पोहचणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
हेलिकॉप्टरद्वारे हा सर्व्हे पूर्ण केला असून शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस या सर्व्हेचे काम करण्यात आले आहे. यानंतर आता या रेल्वेमार्गाला निधी मंजुरीची प्रतीक्षा राहणार आहे. लवकरात लवकर निधी मिळाला तर येत्या काही वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण होऊन येथून वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.