‘एनडीए‌’साठी एसपीआयचे 21 विद्यार्थी पात्र pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

‌NDA selection : ‘एनडीए‌’साठी एसपीआयचे 21 विद्यार्थी पात्र

धाराशिव, बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुण्याच्या उमेदवारांचे यश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या एसपीआयचे 21 विद्याथ र्ी पुणे येथील एनडीए (नॅशनल डिफेन्स अकॅडमी), नेव्हल अकॅडमीसाठी पात्र ठरले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे लष्करी अधिकारीपदासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जातात. त्यात यंदा एसपीआयने आपला ठसा कायम ठेवला आहे.

आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या शंभर पात्रताधारक विद्यार्थ्यांत एसपीआयचे सहा जण असून, उर्वरित 15 गुणवत्ता यादीत आहेत. या विद्यार्थ्यांची जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या एनडीएच्या 156 व्या तुकडीसाठी तर 118 व्या नेव्हल अकॅडमीसाठी निवड झाली आहे. एसपीआयच्या नियंत्रणातंर्गत नाशिक येथे असलेल्या संस्थेतील जिया करपे, समृद्धी इंगळे यांनीही परीक्षेत यश संपादन केले आहे. या दोन्ही विद्यार्थिनी सातारा येथील आहेत.

यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे, गाव, गुणवत्ता क्रमांक, विभाग पुढीलप्रमाणे : सार्थक तावरे, धाराशिव, 27, लष्कर, आशुतोष पांडे, भंडारा, 28, लष्कर, रणजित सोलासकर, सातारा,49, लष्कर, दिग्विजय मुळे, धाराशिव, 73, लष्कर, शौर्य जोशी, बीड, 76, वायुदल, वेदांत हजारे, कोल्हापूर, 93, नौदल, शंकर दराडे, बीड, 112, लष्कर, सुजल भोसले, रत्नागिरी, 139,लष्कर, स्तावन झोडगेकर, मुंबई, 165, नौदल, आदित्य राजगुरू, सातारा, 180, लष्कर, उत्कर्ष मोहरे, छत्रपती संभाजीनगर, 205, लष्कर, अथर्व पाटील, मुंबई, 208, लष्कर, तनिष्क जाधव, सातारा, 215, वायुदल, गंधर्व पोळ, मुंबई, 232, वायुदल, इशान जोशी, पुणे, 272, नौदल, अभिजित सूर्यवंशी, पुणे, 327, लष्कर, शुभम्‌‍ कोळैकेकर, सांगली, 235, लष्कर, सार्थ तुपे, पुणे, 369, लष्कर, स्वराज देसाई, नाशिक, 475, लष्कर, अर्णव जाधव, सांगली, 512, नौदल, प्रज्वल सूर्यवंशी, नाशिक, 557, वायुदल.

सातारा येथील रहिवासी जिया करपे ही महिला उमेदवारांत दुसऱ्या क्रमांकावर असून, समृद्धी इंगळे 15 व्या क्रमांकावर आहे. या दोन्ही विद्यार्थिनीना नौदलात घेण्यात आले आहे.

एसपीआय परीक्षेचा निकाल लवकरच

एसपीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी 5 एप्रिल 2026 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लवकरच एसपीआय संकेतस्थळावर टाकण्यात येईल. तसेच पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती संभाजीनगर येथील एसपीआय केंद्रावर 20 एप्रिलपासून सुरू होणार आहेत,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT