Accident News : भरधाव कार उभ्या कंटेनरवर धडकली; चालक जागीच ठार file photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : भरधाव कार उभ्या कंटेनरवर धडकली; चालक जागीच ठार

सोलापूर-धुळे महामार्गावरील साजापूर शिवारातील दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

Speeding car rams into stationary container; driver killed on the spot

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा: सोलापूर-धुळे महामार्गावरील साजापूर शिवारात महामार्गालगत उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव कार आदळून झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २१) मध्यरात्री शांताई पेट्रोल पंपासमोर घडली. कृष्णा गणेश दहिवाळ (२०, रा. गुरु पिंपरी, ता. घनसावंगी, ह.मु. सहारा भूमी, बजाजनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा दहिवाळ हा कार (एमएच-०२-एक्यू-१३०७) घेऊन तिसगाव फाट्याकडून करोडी टोलनाक्याकडे जात होता. रात्री सुमारे १२.१५ वाजता त्याची कार महामार्गालगत उभ्या असलेल्या कंटेनर (एनएल-०१-क्यू-८४३७) वर भरधाव वेगाने जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागासह इंजिनचा चुराडा झाला, तर कंटेनरच्या मागील लोखंडी भागालाही मोठे नुकसान झाले.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून पेट्रोल पंपावरील कर्मचारी योगेश चांदे, नितीन जिते, गोरख पवार आणि राहुल भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, नातेवाइकांनी कृष्णाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

कंटेनर चालकाने पार्किंगची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी निष्काळजीपणे वाहन उभे केल्यामुळे हा अपघात झाल्याची तक्रार मृताच्या चुलते कालिदास दहिवाळ यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT