Ellora Caves : वेरूळ लेणींवर पर्यटकांची संडे स्पेशल गर्दी file photo
छत्रपती संभाजीनगर

Ellora Caves : वेरूळ लेणींवर पर्यटकांची संडे स्पेशल गर्दी

देशाच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांच्या उपस्थितीने परिसराला उत्सवी स्वरूप

पुढारी वृत्तसेवा

Special Sunday crowd of tourists at Ellora Caves

वेरूळ, पुढारी वृत्तसेवा : इतिहास, कला आणि अद्भुत शिल्पसौंदर्याचा अनोखा ठेवा असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला रविवारी (दि.९) पर्यटकांची मोठी पसंती मिळाली. रविवारच्या सुटीचे औचित्य साधत सकाळपासूनच विविध भागांतून आलेल्या पर्यटकांनी वेरूळ लेणी परिसर गजबजून गेला.

लेणीचे अप्रतिम शिल्पवैभव, भव्य कैलास मंदिर आणि प्राचीन स्थापत्यकलेचा थक्क करणारा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावले वेरूळकडे वळली. तिकीट खिडकीवर पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्याने हाऊसफुल्लचे वातावरण निर्माण झाले होते. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांच्या उपस्थितीने परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.

लेणींच्या दगडात साकारलेले अप्रतिम शिल्प, भव्य वास्तुरचना आणि हजारो वर्षांचा इतिहास जवळून अनुभवताना पर्यटक भारावून गेले. अनेकांनी या ऐतिहासिक ठेव्याच्या सुंदर आठवणी आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या.

व्यावसायिकांमध्ये उत्साह

इतिहासाच्या पाऊलखुणा, शिल्पकलेचे वैभव आणि निसर्गरम्य वातावरण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे वेरूळ ! त्यामुळे सुटीच्या दिवसांत वेरूळला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे. पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, वेरूळ नगरी पुन्हा एकदा पर्यटनाच्या रंगात रंगलेली पाहायला मिळाली-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT