जि. प.च्या सभापती निवडीसाठी २ एप्रिलला विशेष सभा file photo
छत्रपती संभाजीनगर

जि. प.च्या सभापती निवडीसाठी २ एप्रिलला विशेष सभा

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष लागलेल्या विषय समितींच्या सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Special meeting on April 2nd for the election of the District Assembly Speaker

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष लागलेल्या विषय समितींच्या सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यासंदर्भात सुधारित आदेश काढले असून, येत्या २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेनंतर १५ दिवसांच्या आत विषय समितींच्या सभापतींची निवड करणे बंधनकारक असल्याने जिल्हा प्रशासनाने ही विशेष सभा आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक होणार असून, कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांना सहाय्यक म्हणून वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभापती पदासाठी नामांकन अर्ज सभेच्या वेळेपूर्वी दोन तास आधी स्वीकारले जाणार आहेत. या सभेसाठी एकूण सदस्यांच्या एकतृतीयांश उपस्थिती आवश्यक (कोरम) असून, निवडून आलेले सदस्यच मतदान व उमेदवारीस पात्र असतील.

निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या निवडीसंदर्भातील नोटीस सर्व सदस्यांना विशेष दूतामार्फत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. १८ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर आता विषय समितींच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT