Vaijapur News : आईला मदत करणाऱ्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur News : आईला मदत करणाऱ्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथील दुर्दैवी घटना

पुढारी वृत्तसेवा

Son drowns while helping mother

गारज, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथील ढेकू नदीच्या पात्रात आईला कपडे धुण्यासाठी मदत करत असताना अजय पांडुरंग बोरकर या तरुणाचा पाय घसरून नदीपात्रात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.४) रोजी सकाळी साडे आठ वाजता घडली.

धोंदलगाव राहेगाव पुलाजवळील ढेकू नदीच्या काठावर अजय व त्याची आई कपडे धूत होत्या. अजय कपडे धुण्यासाठी आपल्या आईला मदत करत असताना त्याचा अचानक पाय घसरला आणि नदीपात्राच्या खोल पाण्यात पडला. आईने आरडा ओरड केल्याने नदी शेजारी असलेल्या दोघाजणांना नदीपात्रात उडी घेऊन अजयला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. अजय हा उपसरपंच पांडुरंग बोरकर यांचा एकुलता एक मुलगा हा पाण्यात बुडाला.

गाळात फसल्याचा संशय आल्याने तलाठी अमरसिंग बावनकर व ग्रामस्थांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला देऊन पाचारण करण्यात आले. त्यांनी शोधकार्य सुरू केले असता सकाळी ११.३५ वाजता अजयचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

तिथे वैद्यकीय अधिकारी प्रियंका दोडमणे यांनी शवविच्छेदन केले. राहेगाव येथील स्मशानभूमी तीन वाजता शोकाकुल वातावरणात अजयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजयच्या पश्चात आई, वडील, एक लहान बहीण असा परिवार आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आमदार बोरनारे यांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे, तहसीलदार सुनील सावंत, संजय बोरनारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यार्यात मोठी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT