Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेट Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Smart City Project : अखेर स्मार्ट सिटी प्रकल्प बंद

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्प बंद केला आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी दोन-वेळा मुदतवाढ दिली.

पुढारी वृत्तसेवा

Smart City Project Finally Shut Down

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्प बंद केला आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी दोन-वेळा मुदतवाढ दिली. अखेर गुरुवारी (दि.३०) शासन आदेशानुसार महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व ४३ प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करून घेत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये देशातील १०० शहरांसाठी स्मार्ट सिटी अभियान सुरू केले होते. यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेचे २०१६ साली छत्रपती संभाजीनगरचा अभियानात समावेश झाला. या निवडीनंतर तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च करून शहरे स्मार्ट करण्याचा केंद्राचा हेतू होता.

यात केंद्र शासनाकडून ५०० कोटी तर राज्य व महापालिकांचा प्रत्येकी २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार होता. तर त्या त्या महापालिकांनी स्व हिस्स्यापोटी २५० कोटी रुपये टाकणे बंधनकारक होते. स्मार्ट सिटी अभियानात छत्रपती संभाजीनगरची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनी स्थापन करण्यात आली.

या कंपनीने मागील ८ वर्षांत शहरात विविध विकासाची कामे केली. यात स्मार्ट शहर बस, एमएसआय, मिटमिटा भागात सफारी पार्क उभारणे, शहरात ३०७ कोटी रुपये खर्चाचे स्मार्ट रस्ते, स्मार्ट स्कूल, ई-गव्हर्नन्स, स्मार्ट हेल्थ, रस्त्यालगतचे बोलार्ड, बस डेपो अशा ४३ प्रकल्पांचा समावेश आहे. यातील कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दोनवेळा मुदतवाढ दिली होती. परंतु अद्यापही प्रकल्पाचे काम अपूर्णच असून, सिडको नाट्यगृह, इलेक्ट्रिक सिटी बस सेवा, सफारी पार्कची कामे अर्धवट आहेत.

रस्त्यांचे फर्निचर शिल्लक

शहरातील १०६ रस्त्यांचे कॉक्रिट्रीकरण आणि रोड फर्निचरचे काम स्मार्ट सिटीचे ३१७ कोटी रुपये खर्चुन करण्यात आले. परंतु, अजूनही यातील रोड अनेक ठिकाणच्या रस्त्यांच्या दुभाजक, फुटपाथ, साईड पंखे भरण्याचे काम शिल्लक आहे. तर बहुतांश रस्त्यांवरील सिमेंटचा सरफेस निघून गेला आहे.

सिटी बससाठी मुदतवाढ

शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार स्मार्ट सिटीचे सर्व कर्मचाऱ्यांना गुरुवारी (दि.३०) कार्यमुक्त करण्यात आले. दहा वर्षांपासून हे कर्मचारी कंत्राटीतत्त्वावर सेवेत होते. तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिकारी त्यात्या विभागाकडे वर्ग केले आहे. तर केवळ सिटीबस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना एक महिन्याची मुदतवाढ दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT