सिल्लोड : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अनुष्काचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी सिल्लोड तालुक्यात लहुजी क्रांती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकार व स्थानिक प्रशासनाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त समाजबांधवांनी मुंडण आंदोलन करत तीव घोषणाबाजी केली.
4 जानेवारी रोजी अनुष्काचा मृतदेह वसतिगृहात संशयास्पद अवस्थेत आढळून आला असून, ही घटना जीवन संपवण्याचा बनाव करून पोलिस प्रशासन विद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात काळे झेंडे व काळ्या पट्ट्या बांधून संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार शेख हरुण यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात शिपायाची नार्को टेस्ट, दोषींना सेवेतून बडतर्फ करणे, सहआरोपी निश्चित करणे, पीडित कुटुंबाला 50 लाखांची मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजातील चिमुकल्या मुलींच्या हस्ते देण्यात आले. मोर्चाला लहुजी क्रांती सेनेचे प्रमुख पदाधिकारी अशोकराव कांबळे, सखाराम आहिरे, नानासाहेब गायकवाड, साहेबराव दणके व फकिरचंद तांबे यांनी संबोधित केले.
यावेळी नामदेव खेत्रे, शिवराम कांबळे, त्रिंबक शेजूळ, काशिनाथ शिंदे, साहेबराव आहिरे, भगवान सोनवणे, किशोर भिसे, समाधान लोखंडे, विष्णू साळवे, रतन आंभोरे, दादाराव सिरसाठ, नितीन सौदागर, साहेबराव सोनवणे, मुरलीधर जाधव, नितीन दणके, संतोष उन्होंने, एकनाथ आघाम, विठ्ठल खोतकर, सागर खेत्रे, विकास गायकवाड यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिपायाला बडतर्फ करण्याची मागणी
नवोदय विद्यालयातील शिपायाच्या जाचाला कंटाळून सदर विद्यार्थीने टोक्ाचे पाऊल उचल्याचा आरोप मातंग समाज बांधवानी केला आहे.शिपायाची नार्को टेस्ट, दोषींना सेवेतून बडतर्फ करणे करण्याची मागणी आंदोलकांनी तहसीलदार शेख हरुण यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाव्दारे केली आहे. डतहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात काळे झेंडे व काळ्या पट्ट्या बांधून संताप व्यक्त करण्यात आला. मोर्चादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.