खेळणा धरण pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar rain : मुसळधार पावसाने खेळणा धरण ३० टक्क्यांवर

अंभई, आमठाणा मंडळात पुन्हा अतिवृष्टी; केळगाव धरण ओव्हरफ्लो, अजिंठा-अंधारीत अद्याप निराशा

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड : सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सिल्लोड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. अंभई व आमठाणा मंडळांत पुन्हा अतिवृष्टीची नोंद झाली असून केळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तर सिल्लोड शहरासह १५ गावांची तहान भागविणाऱ्या खेळणा धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, अजिंठा-अंधारी धरण अद्यापही जोत्याखालीच असल्याने त्या परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा कायम आहेत.

गुरुवारी तालुक्यात सरासरी ११५ मिमी, तर शुक्रवारी ४६ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पूर्णा व खेळणा नद्यांना पूर आला असून शेतकऱ्यांच्या कोमेजलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दोन दिवसांच्या पावसामुळे केळगाव धरण भरून वाहू लागले आहे. खेळणा धरणात ३० टक्के,निल्लोड धरणात १० टक्के आणि चारनेर-पेंडगाव धरणात १२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, अजिंठा-अंधारी धरण अद्यापही जोत्याखालीच असल्याने त्या भागातील पाणीस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

पावसाळ्याला दीड महिना उलटल्यानंतरही धरणांमध्ये समाधानकारक साठा नव्हता. मात्र, गेल्या दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे नदी-नाले खळखळून वाहू लागले असून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटला आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ४४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT