श्री घृष्णेश्वर मंदिर उद्या दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत बंद file photo
छत्रपती संभाजीनगर

श्री घृष्णेश्वर मंदिर उद्या दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत बंद

चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Shri Ghrishneshwar Temple will be closed tomorrow from 3 pm to 7 pm

खुलातबाद, पुढारी वृत्तसेवा : श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने भाविकांसाठी आवाहन करण्यात आले की, मंगळवारी (दि. ३) रंगपंचमीच्या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

ग्रहणकाळात धार्मिक परंपरा व शास्त्रानुसार मंदिराचे मुख्य दरवाजे बंद ठेवण्याची पद्धत असल्याने ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सर्व प्रकारचे दर्शन, पूजा-अर्चा तसेच धार्मिक विधी तात्प-रते स्थगित राहतील. त्यामुळे भाविकांना दर्शन घेता येणार नाही.

मंदिर प्रशासनाकडून ग्रहण समाप्तीनंतर शुद्धीकरण विधी पार पाडून मंदिर नियमित वेळेनुसार दर्शनासाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांनी या वेळा-पत्रकाची नोंद घ्यावी व दर्शनासाठी नियोजन करताना संबंधित वेळ लक्षात घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाकडून भाविकांनी संयम व सहकार्य दाखवावे, अशी विनंती केली असून, सर्वांनी धार्मिक परंपरेचा आदर राखून सहकार्य करावे, असेही ट्रस्टतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT