Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्हाभरात 'उबाठा'चा क्या हुआ तेरा वादा !  File photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : जिल्हाभरात 'उबाठा'चा क्या हुआ तेरा वादा !

शासनाचा निषेध : तहसील कार्यालयावर मोर्चा, तहसीलदारांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray's party movement "Kya Hua Tera Vaada" Marathwada

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा

सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने बुधवारी (दि.११) शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन दिले.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन वाणी, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल न्हावले, उपजिल्हाप्रमुख अक्षय साठे, उपतालुकाप्रमुख अँड रमेश सावंत, राहुल साळुंखे, संकेत वाणी, उपश-हरप्रमुख शिवाजी जाधव, रवींद्र पगारे, मनोज त्रिभुवन, शौकत शाह, रवींद्र हौसरे, बिलास धने, उज्वल कदम, राजू नवले, चंद्रभान हजारे, भगवान शिंदे, दिगंबर वाघचौरे, सिराज शेख, गब्बू पठाण, काकासाहेब मिसाळ, बाजीराव पवार, सुनील ठोंबरे, बापू ठोंबरे, गणेश शिंदे, गणेश पवार, गोकुळ वाघ, लक्ष्मण सोळसे, अशोक पगारे, बाळासाहेब मिसाळ, अमजद शेख, कपिल पगारे, आदीसह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात क्या हुवा तेरा वादा हे आंदोलन करण्यात आले. निवडणुकीपूर्वी सरकारने अनेक आश्वासने दिली होती, पण त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी बुधवारी (दि.११) तहसीलदार कार्यलयवर धडक मोर्चा काढण्यात आला. ४५ हजार गावांमध्ये पाणंद रस्ते करू असे हे सरकार सांगत होते, मात्र ही योजना केवळ कागदावरच रेंगाळत आहे.

फअन्नदाता बनेल ऊर्जादाताफही योजनाही धूळफेक असल्याचा आरोप करण्यात आला. लाडक्या बहिणींना १५०० वरून २१०० मानधन देऊ असे सरकार बोलले होते, परंतु १५०० देखील वेळेवर येत नाहीत, ही परिस्थिती आहे. लोडशेडिंगमुळे शेतकरी त्रस्त आहेत, महर घर जल हर घर छतफया योजनेच्या माध्यमातून अनेक स्वप्न दाखवली, पण जनतेची घोर निराशा झाली. एक रुपयात पीक विम्याची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. ती योजना आता बंद करण्यात आली असून, विमा कंपन्यांनी दीड लाख कोटीपेक्षा जास्त प्रीमियम गोळा करून ५० हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम स्वतःच्या खिशात घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शासनाला जाब विचारण्यासाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चाचे नेतृत्व तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी केले. उपतालुकाप्रमुख अविराज निकम, ता. संघटक गणेश आधाने, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश वाकळे, सरपंच अतिश देवगिरीकर, उपतालुकाप्रमुख दत्ता मालोदे, शंकर आधाने, शहरप्रमुख विष्णू फुलारे, सतीश शुक्ला, मा.जि. प.सदस्य मोहन चदवाडे, आकाश हिवर्डे प्रकाश जाधव, कृष्णा घुले, विभागप्रमुख नानासाहेब चव्हाण, विजय चव्हाण, सुनील भोसले, उपशहरप्रमुख मुकेश मालोदे, उपविभागप्रमुख किशोर होळकर, बाळू खुटे, किशोर काळे, सरपंच आप्पाराव नलावडे, संदीप गायकवाड आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, व शेतकरी भगवे झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. तहसीलदार यांना निवेदन देऊन या आंदोलनाची सांगता झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT