Chhatrapati Sambhaji Nagar : कुलगुरु डॉ. फुलारी यांना कर्नल उपाधी

ब्रिगेडियर ए. जी. बारबरे यांनी मा. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांना कर्नल कमांडंट उपाधी तसेच महासंचालक लेप्टनंट जनरल गुरबिरपाल सिंग यांचे पत्र सुपूर्द केले.
Chhatrapati Sambhaji Nagar News
Chhatrapati Sambhaji Nagar : कुलगुरु डॉ. फुलारी यांना कर्नल उपाधीFile Photo
Published on
Updated on

Vice Chancellor Dr. Phulari was given the rank of Colonel

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुजारी कर्नल कमांडर या मानद उपाधीने बुधवारी (दि.११) समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.

Chhatrapati Sambhaji Nagar News
Chhatrapati Sambhajinagar News : संशोधनासाठी गाईड देता का गाईड...

राष्ट्रीय छात्रसेनेच्यावतीने बुधवारी विद्यापीठात हा सोहळा पार पडला. मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर प्रारंभी राष्ट्रीय छात्रसेनेच्यावतीने कुलगुरु यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर महात्मा फुले सभागृहात मुख्य कार्यक्रम झाला.

कार्यक्रमास एनसीसी छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए. जी. बारबरे, कमांडिंग ऑफिसर कर्नल बीपीएस ठाकूर, प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची मंचावर उपस्थिती होती.

Chhatrapati Sambhaji Nagar News
Chhatrapati Sambhajinagar News : इटलीच्या उद्योगांना संभाजीनगरला येण्याचे निमंत्रण

यावेळी ब्रिगेडियर ए. जी. बारबरे यांनी मा. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांना कर्नल कमांडंट उपाधी तसेच महासंचालक लेप्टनंट जनरल गुरबिरपाल सिंग यांचे पत्र सुपूर्द केले. तसेच बॅटन ही सन्मानपूर्वक प्रदान केले. एनसीसी गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉ. माधुरी सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news