Illegal Sand Mining : मंठ्यात वाळूमाफियांचा हैदोस file photo
छत्रपती संभाजीनगर

Illegal Sand Mining : मंठ्यात वाळूमाफियांचा हैदोस

अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीविरोधात शिवसेना आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena Takes Aggressive Stance Against Illegal Sand Mining and Transportation

मंठा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि जीवघेण्या वाहतुकीविरोधात तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करून निवेदन देण्यात आले. हजारो ब्रास वाळूची खुलेआम चोरी होत असताना संबंधित प्रशासन मात्र संशयास्पद शांत भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

तालुक्यात दिवस-रात्र अवैध वाळू उत्खनन सुरू असून शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. नदीपात्रांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असतानाही महसूल विभाग, पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कारवाईस टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अतिवेगाने धावणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्या मुळे प्रशासनाने वाळूमाफियांवर लक्ष देण्याची गरज आहे असे शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी म्हटले आहे. या वेळी देण्यात आलेल्या निवेदनावर रामराव वायाळ, भगवानराव गायकवाड, बाळासाहेब देशमुख, दिलीप हिवाळे, नितीन मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या केलेल्या आहेत.

प्रशासनाच्या लक्ष देण्याची गरज अतिवेगाने धावणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रांची मोठ्या प्रमाणावर हानी आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे महसूल विभाग, आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल.
-उदयसिंह बोराडे, तालुकाप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT