Political News : शिवसेनेचे नगरसेवक बैलगाडीतून मनपात दाखल file photo
छत्रपती संभाजीनगर

Political News : शिवसेनेचे नगरसेवक बैलगाडीतून मनपात दाखल

इंधन बचतीचा केला निषेध, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Thackeray Shiv Sena Corporators Arrive at Municipal Corporation in a Bullock Cart

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशात इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याऐवजी बचतीचे आवाहन केले जात आहे. अन्नदात्याला शेतीच्या मशागतीसाठीही डिझेल उपलब्ध होत नसेल तर यापेक्षा अधिक शोकांतिका काय, असे म्हणत बुधवारी (दि.२०) शिवसेनेच्या (ठाकरे गट) ७ नगरसेवकांनी गटनेता गणेश लोखंडे यांच्या नेतृत्त्वात बैलगाडीतून महापालिकेत प्रवेश करीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला. त्यासोबतच जय भवानी, जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देत परिसर दणाणून टाकला.

यावेळी माजी महापौर तथा नगरसेवक रशीद मामू खान, सचिन खैरे, हनुमान शिंदे, सुनीता सोनवणे, सावित्री वाणी, वैशाली कोरडे यांच्यासह राहूल कुमार सोनवणे, रामेश्वर कोरडे हे बैलगाडीतून महापालिकेला आले. सेनेचे हे सर्व नगरसेवक घोषणाबाजी करीत महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहचताच त्यांना पोलिसांनी रोखले.

बैलगाडी मुख्यालयात नेता येणार नाही, असे पोलिस म्हणाले. त्यावरून शिवसेना नगरसेवक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर नगरसेवक प्रवेशद्वारासमोर बैलगाडीतून खाली उतरून महापालिका मुख्यालयातील सर्वसाधारण सभेच्या सभागृहात गेले.

सध्या आठवडाभरामध्ये दोन वेळा पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल मिळेना तसेच पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड झळकत आहेत. त्यात मान्सून तोंडावर असताना शेतकऱ्यांना मशागतीसाठी डिझेल मिळत नसल्याने त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असून, या इंधन तुटवड्याचा निषेध करण्यासाठी आम्ही नगरसेवक बैलगाड्यांतून महापालिकेत आलो, असे गट नेता लोखंडे म्हणाले.

त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केले आहे, त्या आवाहनला उपरोधिक प्रतिसाद म्हणून हे निषेध आंदोलन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. तसेच बचतीसाठी खर्चात काटकसर करणार का? असा सवालही उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT