Sambhajinagar political protest : मनपा स्वीकृत नगरसेवक पदावरून शिंदे सेनेत उद्रेक

उपमहापौरांच्या प्रतिमेला मारले जोडे, भाजपमध्ये नाराजी नाट्य
Sambhajinagar political protest
शिवसेना शिंदे गटाचे विनोद बनकर व कार्यकर्त्यांनी क्रांतीचौकात उपमहापौरांविरोधात आंदोलन करीत घोषणाबाजी केली.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपले नाव डावलून उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी ऐनवेळी प्रदीप शिंदे यांचे नाव निश्चित केले, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे विनोद बनकर यांनी क्रांतीचौकात उपमहापौरांविरोधात आंदोलन करीत प्रतिमेला जोडे मारले. तसेच काही कार्यकर्त्यांनी प्रतिमा फाडत हायहायच्या घोषणा दिल्या. त्यामुळे पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तर अनेक जुन्या माजी नगरसेवकांना डावलण्यात आल्याने भाजपमध्येही नाराजीचे चित्र दिसून आले.

शासनाच्या नव्या नियमामुळे यंदा महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवक निवडून देण्यात आले आहेत. महापौर समीर राजूरकर यांनी तौलनिक संख्याबळ असलेल्या राजकीय पक्ष व नोंदणीकृत गटांच्या नेत्यांकडून प्राप्त झालेल्या पत्रातील नावांवर सोमवारी शिक्कामोर्तब केला.

Sambhajinagar political protest
Chatarapati Sambhajinagar: महापालिकेची पहिलीच सभा गाजली; २२ खोके’च्या घोषणांनी सभागृह दणाणले

यात भाजपच्या वाट्याला ५, एमआयएमला ३ आणि शिंदेसेना, उद्धवसेना यांना प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य देता आले. मात्र, शिंदे सेनेत या नावावरून पुन्हा एका पालकमंत्री संजय शिरसाट-उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. स्वीकृतसाठी शिंदेसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या इच्छुकांपैकी एक असलेले विनोद बनकर यांना पक्षाने स्वीकृत नगरसेवक करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याच्याऐवजी शिंदे यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, बनकर हे पालकमंत्री शिरसाट यांचे कार्यकर्ते असल्यामुळेच उपमहापौर जंजाळ यांनी डावलले, असा आरोप करीत बनकर यांनी क्रांतीचौकात आंदोलन केले. उपमहापौरांविरोधात जोरदार घोषणा देत पालकमंत्री संजय शिरसाट तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, असे म्हणत त्यांनी उपमहापौरांच्या प्रतिमेला जोडे मारून फाडले. या आंदोलनामुळे सेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. यापूर्वी महापालिका निवडणुकीवेळी देखील असेच आंदोलन सेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी केले होते.

Sambhajinagar political protest
छत्रपती संभाजीनगर, परभणी जि.प. मध्ये भाजपचा अध्यक्ष

भाजपमध्येही नाराजी

भाजपकडून ५ जणांना स्वीकृतसाठी संधी मिळणार होती. त्यामुळे यात आपल्याला संधी मिळेलच, असे अनेक जुन्या नगरसेवकांना वाटले होते. त्यामुळे पक्षादेशानुसार भाजपचे पूनमचंद बमणे, आशा बिनवडे यांनी उमदेवारी दाखल केली. परंतु, पक्षाने त्यांच्याऐवजी नव्यांना संधी दिल्याने नाराजीचा सूर दिसून आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news