ZP Election : संभाजीनगरात शिवसेना- भाजप युतीचा झेंडा Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

ZP Election : संभाजीनगरात शिवसेना- भाजप युतीचा झेंडा

भाजप-शिवसेनेला ४४ जागा, काँग्रेसचा सुपडासाफ, तर ठाकरे सेनेला ९ जागा

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena-BJP alliance flag in Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा फडकला. जिल्हा परिषदेच्या ६३ गटांपैकी भाजपने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या, तर शिवसेनेलाही तब्बल २१ जागांवर यश मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४ जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत ठाकरे सेनेला ९ आणि काँग्रेसला अवधी १ जागा जिंकता आली. शरद पवारांच्या राष्ट्रबादीला १, प्रहार पक्षाला १ आणि ३ जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला.

सन २०१७ सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने २३ जागांवर विजय मिळविला. मागीलवेळी अखंड शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. यावेळी शिंदेंच्या सेनेने चमकदार कामगिरी करत २१ जागा जिंकल्या. तर ठाकरे सेनेनेही ९ जागांवर झेंडा फडकविला.

यावेळी काँग्रेसची मात्र मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली मागीलवेळी १६ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ एक जागा मिळाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने यावेळी चार जागा जिंकल्या. गतपेक्षा राष्ट्रवादीने एक जागा अधिक जिंकली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही १ जागा मिळाली आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला मात्र जिल्ह्यात एकही जागा मिळविता आली नाही. तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेनेने जिल्ह्यात सिल्लोड आणि पैठण या दोन तालुक्यांतच १४ जागा जिंकल्या आहेत. पैठणमध्ये खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी जोर लावल्याने पक्षाला ८ जागा जिंकता आल्या. तर सिल्लोड तालुक्यात आमदार अब्दुल सत्तार यांनी ६ जागा जिंकल्या आहेत.

नऊपैकी नऊ पंचायत समिती महायुतीच्या ताब्यात

जिल्ह्यातील नऊपैकी नऊ पंचायत समितीमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे वर्चस्व राखले आहे. पैठण, कन्नड, सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, फुलंब्री, गंगापूर या सर्व पंचायत समितीमध्ये महायुतीच्या घटक पक्षांना बहुमत मिळाले आहे. त्यामुळे सर्व पंचायत समितीमध्ये महायुतीचेच सभापती बसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT