Sambhajinagar News : आश्रमशाळेतील गैरकारभाराविरोधात 'शिक्षक भारती' आक्रमक file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : आश्रमशाळेतील गैरकारभाराविरोधात 'शिक्षक भारती' आक्रमक

उपसंचालक कार्यालयासमोर भटके विमुक्त दिनी तीव्र धरणे आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

'Shikshak Bharati' takes an aggressive stance against mismanagement in ashram schools

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पैठणखेडा येथील 'कलावैभव मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट' संचलित श्रीकृष्ण प्राथमिक आश्रमशाळेतील संस्थाचालकांच्या मनमानी, नियमबाह्य कारभाराविरोधात 'शिक्षक भारती' संघटनेच्या वतीने भटके विमुक्त दिनी सोमवारी (दि.३१) प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालयासमोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले.

या आश्रमशाळेचे व्यवस्थापन शासनाने त्वरित ताब्यात घेऊन तिथे तत्काळ प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. या आश्रमशाळेत चाललेल्या ढिसाळ आणि बेकायदेशीर कारभार आणि दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अपुऱ्या व असुरक्षित सुविधा, अनुदानाचा गैरवापर, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आहे.

यासंबंधी २२ जुलै २०२६ रोजी पालकांनी आणि त्यानंतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी येथील सहाय्यक संचालकांकडे तक्रार केली होती. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे संस्थाचालकांचे धाडस वाढल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाच्या भेटीत प्रादेशिक उपसंचालक तेजस माळवतकर यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे राज्य नेते प्रकाश दाणे, जिल्हाध्यक्ष बिजू मारग, सरचिटणीस वसंत जोगदंड, शहर अध्यक्ष भरत पाटील, शहर सचिव शिवकुमार वाणी, जिल्हा उपाध्यक्ष संजय बाजी, राजेंद्र रोडे, पोपट नलावडे, शक्तीसिंग छानवाल, दगडू शहा, श्रीराम मैंद, चरणसिंग जारवाल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT