Shendra MIDC : एमआयडीसीत दिवे लागत नसतील तर कंत्राटच रद्द करा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Shendra MIDC : एमआयडीसीत दिवे लागत नसतील तर कंत्राटच रद्द करा

दुरुस्तीवर दरवर्षी लाखोंची उधळपट्टी कशाला ?

पुढारी वृत्तसेवा

Shendra MIDC: If there are no lights in MIDC, cancel the contract

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर :

पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखोंचे कंत्राट देऊनही अनेक वर्षांपासून बहुतांश रस्त्यांवर अंधार आहे. मग दरवर्षी ही लाखोंची उधळपट्टी कशाला ? सरळ कंत्राटच रद्द करावे, असा रोष उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. तर मसिआनेही जुन्या दिव्यांच्या दुरुस्तीवर नाहक खर्च कशाला, जुनी लाईनच बदलून नवीन एलईडी दिवे लावण्याची मागणी एमआयडीसीकडे केली आहे.

फाईव्ह स्टार नव्हे स्लम औद्योगिक वसाहत

शेंद्रा एमआयडीसीत लहान-मोठ्या एक हजाराहून अधिक उद्योगांसाठी सुमारे २००० लाईट्स, १२०० फिटिंग आणि ८५० पोल आहेत. हे पथदिवे चालू ठेवण्यासाठी दरवर्षी २७लाखांचे टेंडर काढले जाते. गतवर्षी असंसो लाईट्स यांना कंत्राट देण्यात आले होते. दुरुस्तीच्या नावाने त्यांनी वर्षभर कागदोपत्री दिवे लावले. त्यामुळे अनेक अंतर्गत रस्त्यांवरील बहुतांश पथदिवे बंद होते. ५ नोव्हेंबरपासून बिटा नवीन एलईडी लाइट्स लावावेत.

जुने सोडियमचे पथदिवे आहेत. शेंद्रा एमआयडीसीमध्ये अनेक वर्षे त्यावर देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाया जातोय. त्यामुळे जुने लाइट्स बदलून नवीन एलईडी दिवे लावावेत, असा प्रस्ताव मसिआकडून एमआयडीसीला दिला आहे.
-सचिन गायके, सचिव, मसिआ.

इलेक्ट्रिकल यांना कंत्राट दिले. मात्र काही प्रमुख मार्ग वगळता बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर अनेक वर्षांपासून अंधार आहे. दररोज सायंकाळनंतर अपघात, लहान-मोठ्या चोऱ्या-लुटमारीचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे उद्योजक, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही बंद पथदिव्यांची दुरुस्ती न झालेली नाही. यावरही ठेकेदारावर जबाबदार अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने मनमानी सुरू आहे. याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

...तर कंत्राट रद्द करावे नियमांनुसार ठेकेदाराने दिवे लावणे जरुरी आहे. जर दिवेच लागत नसतील तर कंत्राट रद्द करावे. पुन्हा त्यास एमआयडीसीत कोणत्याही प्रकारचे कंत्राट प्रक्रियेत सहभागी होण्यासही मज्जाव करायला हवा.
-अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ.

कुठे बंद दिवे, तर कुठे नुसतेच खांब उभे

शेंद्रा एमआयडीसीत कुठे तुटलेले दिवे, तर कुठे नुसतेच खांब उभे... उघड्या धोकादायक फिटिंग आणि लोंबकळणारी वायर... यामुळे रस्त्यांवर काळाकुट्ट अंधार... असे दयनीय चित्र अद्यापही फारसे बदललेले नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT