Sambhajinagar Crime News : गावठी कट्टा बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला बेड्या File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : गावठी कट्टा बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला बेड्या

पंचायत समितीजवळ एनडीपीएसच्या पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Shackles to the accused on record for carrying Gavathi katta

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

नशेखोरांवर कारवाईसाठी गेलेल्या एनडीपीएसच्या पथकाने गावठी कट्टा बाळगणारा रेकॉर्डवरील आरोपीला बेड्या ठोकल्या. ही कारवाई सोमवारी (दि. १६) गणेश कॉलनी, पंचायत समितीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावर करण्यात आली. इसरार निसार खान (२३, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड) असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, गुन्हेगारीचे मूळ हे नशेखोरीत असल्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नशेखोरांवर कारवाईसाठी एनडीपीएसचे स्वतंत्र पथक नेमले आहे. गांजा, ड्रग्स, बटन आदी नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्यांसह नशापाणी करणाऱ्यांवर पथकाकडून अडगळीच्या जागा, मोकळ्या मैदानावर शोध घेऊन कारवाई केली जाते. सोमवारी गस्त घालत सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेश कॉलनी भागात पथक गेले होते.

पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानावर नशेखोर नेहमी बसत असल्याने पथकाने तिथे बसलेल्या काही टवाळख-ोरांची चौकशी केली. त्यात रेकॉर्डवरील आरोपी इसरार खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला.

पोलिसांनी गावठी कट्टा जप्त करून सिटी चौक पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरक्षक अमोल म्हस्के, जमादार लालाखान पठाण, अंमलदार संदीपान धर्मे, सतिष जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदरडे, छाया लांडगे, तेलोरे यांनी केली.

मोबाईलमध्ये गावठी कट्टा हाताळतानाचे फोटो

इसरार याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यात गावठी कट्टा बाळगतानाचे फोटोही पोलिसांना मिळून आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी मारहाणीचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा गावठी कट्टा त्याने कोठून आणला, याचा तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT