Sambhajinagar Municipal Corporation News : महापालिकेत लवकरच होणार ५२ पदांची भरती

विभागीय आयुक्तांची रोस्टरला मंजुरी, प्रक्रिया अंतिम टप्प्यात
Sambhajinagar Municipal Corporation News
Sambhajinagar Municipal Corporation News : महापालिकेत लवकरच होणार ५२ पदांची भरतीFile Photo
Published on
Updated on

Recruitment for 52 posts will be done soon in the Municipal Corporation

छत्रपती संभाजीनगरी, पुढारी वृत्त-सेवा : महापालिकेत ५२ पदांच्या भरतीसाठी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या रोस्टरला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच भरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे. शासन नियुक्त आयबीपीएस कंपनीकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sambhajinagar Municipal Corporation News
Sambhajinagar Crime News : जवाहरनगरात भरदिवसा घर फोडून १५ तोळ्यांचे दागिने लंपास

महापालिकेतील अधिकारी-कर्माचारी मोठ्या संख्येने निवृत्त होत आहेत. मात्र आस्थापनेवरील खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने नोकर भरतीस मंजुरी दिली आहे. सुरुवातीला १२४ पदे भरण्यात आली होती. यातील १५ उमेदवारांनी रुजू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांतच नोकरीचा राजीनामा दिला. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली. त्यात वर्षभराचा वेळ वाया गेला.

दरम्यान शासनाने महापालिकेला दुसऱ्या टप्प्यातील २६७ पदांच्या भरतीची मंजुरी दिली. या भरतीत एकूण १२ संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने बिंदूनामावली तयार करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयाने यातील ५२ पदांच्या रोस्टरला मंजुरी दिली आहे.

Sambhajinagar Municipal Corporation News
Sambhajinagar News : बीओटीच्या सर्व प्रकल्पांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या आयबीपीएस कंपनीमार्फत महापालिकेने पहिल्या टप्प्यातील नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील नोकरभरतीही याच कंपनीमार्फत केली जाणार आहे. ५२ पदांच्या भरतीप्रक्रियेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. त्यात उपअग्निशमन केंद्र अधिकारी-४, यंत्रचालक-१७, सुरक्षाअधिकारी-१, उद्यान सहाय्यक-९, रोखपाल १२ अशा पदांचा यात समावेश आहे.

१७५ जागांसाठी प्रक्रिया सुरू

आणखी १७५ जागांसाठी रोस्टर मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. तसा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य-३२, स्थापत्य अभियंता (यांत्रिकी- २४, अग्निशमनक-१००, स्वच्छता निरीक्षक १२, पशुधन पर्यवेक्षक - ७ अशा पदांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news