एका उद्योजकाच्या दुकानासह सात व्यावसायिक मालमत्ता सील file photo
छत्रपती संभाजीनगर

एका उद्योजकाच्या दुकानासह सात व्यावसायिक मालमत्ता सील

शहरातील पाच झोन कार्यालयांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Seven commercial properties, including an entrepreneur's shop, sealed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली असून, व्यावसायिक २, मालमत्ताधारकांकडे थकलेली लाखो रुपयांची थकबाकी वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे. झोन ५,७,८,९ व १० कार्यालयांतर्गत असलेल्या देवळाईतील मुस्तफाबाद येथील १, ईटखेडा मधील १, काल्डा कार्नरजवळील १, चिश्तिया कॉलनी व सनी सेटरमधील प्रत्येकी १ अशा सात व्यावसायिक मालमत्तांना (दुकाने) महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.१२) सील ठोकले.

महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांना सील ठोकण्याची कारवाई हाती घेतली आहे. शहरातील अनेक मालमत्ताध-ारकांकडे कोट्यवधी रुपयांचा कर थकलेला आहे. कर वसुलीसाठी दोन वेळा सवलत जाहीर करूनही मालमत्ताधारक कर भरण्याकडे टाळाटाळ करत आहेत. मार्च महिना सुरू झाला असून, कराच्या वसुलीसाठी थेट सील आणि जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, गुरुवारी झोन-५,७,८,९ व १० कार्यालयांतर्गत असलेल्या व्यावसायिक मालमत्ताधारकांकडील कर वसुलीकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. यात देवळाई येथील आई अपार्टमेंटमधील बाबूराव हिवराळे यांच्याकडे १ लाख ९५ हजारांचा कर थकल्याने त्यांच्या मालकीची तीन दुकाने, तसेच विनायक पार्क येथील शशिकांत टाकळकर यांच्याकडे २ लाख ३० हजारांचा मालमत्ता कर तर मुस्तफाबाद येथील आदमाने यांच्याकडे १ लाख ६७ हजार ३९५ रुपये व ईडखेडा भागातील दिशा संस्कृतीमधील दिलीप पारीख यांच्याकडे १ लाख २४ हजार ९०३ रूपयांचा तर काल्डा कॉर्नरमधील पंकज फुलपगार व इतर यांच्या मालकीच्या दुकानाकडे १ लाख २६ हजार ८९६ रुपये आणि मनोज साबळे यांच्याकडे १ लाख १० हजारांचा कर थकल्याने सनी सेंटरमधील त्यांच्या मालकीचे दुकान अशा एकूण ७मालमत्तांना सील ठोकण्यात आले आहे.

दरम्यान, मालमत्ताधारकांकडे सव्वालाख ते अडीच लाखांचा कर थकला होता. मात्र आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मनपाच्या कर वसुली पथकाने दाखवले नाही. दरम्यान, मनपा आयुक्तांनी वसुलीचा दट्ट्या देताच पथकाने कारवाई सुरू करत दुकानांना सील ठोकण्यात आले. या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT