Sambhajinagar Crime News : ज्येष्ठ नागरिकाची ९ लाख ४६ हजारांची फसवणूक  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष, ज्येष्ठ नागरिकाची ९ लाख ४६ हजारांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष

पुढारी वृत्तसेवा

Senior citizen cheated of Rs 9 lakh 46 thousand

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शेअर मार्केटमध्ये मोठा नफा देण्याचे आमिष दाखवून व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक व त्याच्या मुलाला तब्बल ९ लाख ४६ हजार ५०० रुपयांना चुना लावल्याचे नुकतेच उघडकीस आले. हा प्रकार १० नोव्हेंबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ दरम्यान गोकुळनगरी, सुधाकरनगर रोड परिसरात घडला. या प्रकरणी व्हॉट्सअप ग्रुप अॅडमीन ऐश्वर्या राजपूतसह सात जणांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

किशोर संतोषराव पाटील (७६, रा. गोकुळनगरी) हे १० नोव्हेंबर २०२४ रोजी व्हीआयपी ७३-एजीआय ग्रुप या अलायन्झ कंपनीशी संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सानिध्यात आले. ग्रुप अॅडमीन ऐश्वर्या राजपूत हिने शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. या आमिषापोटी पाटील यांनी २७ नोव्हेंबर २०२४ ते ११ डिसेंबर २०२४ दरम्यान तब्बल ६लाख ४६ हजार ५०० रुपये गुंतवले.

नफ्याची खोटी माहिती

ऐश्वर्या आणि तिच्या सहकाऱ्यांनी पाटील यांना १० शेअर्स व इतर गुंतवणुकीत २ जानेवारी २०२५ रोजी २८ लाख ७८ हजार ३१२ नफा मिळाल्याची खोटी माहिती सांगितली. कारण मागणी करूनही पैसे पाटील यांना मिळालेच नाहीत, असे असूनही कमी कालावधीत जास्त नफा मिळत असल्याने पाटील यांच्या मुलानेही ३ लाखांची गुंवणूक केली.

सात जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणात पाटील यांचे पैसे हडप करणाऱ्यांत ऐश्वर्या राजपूत, अलायन्झ टीमचे अमित सिन्हा, निशा त्रिवेदी, अनिल मेहता, राजाराम शर्मा आणि तन्वी मुखर्जी यांचा सहभगा असल्याचे स्पष्ट झाले. या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस निरीक्षक संग्राम ताटे करीत आहे.

पैसे काढण्यासाठी २० टक्के कमिशन

९ जानेवारी रोजी ऐश्वर्यान ग्रुपवर नफ्यात मिळा-लेली रक्कम काढण्यासाठी रकमेवर २० टक्के कमिशन भरावे लागेल असा मॅसेज टाकला. याची शंका आल्याने पाटील यांनी ग्रुपमधील इतर क्रमांकावर इतर गुंतवणुकदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT