Gambling Den : तनवाणीच्या जुगार अड्ड्यावर तीन महिन्यांत दुसऱ्यांदा छापा file photo
छत्रपती संभाजीनगर

Gambling Den : तनवाणीच्या जुगार अड्ड्यावर तीन महिन्यांत दुसऱ्यांदा छापा

गुन्हे शाखेची कारवाई; कॅसिनो स्टाईल जुगार, ३९ जण ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Second raid in three months on Tanwani’s gambling den

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : औरंगपुऱ्यातील विष्णू तनवाणी याच्या हायप्रोफाईल जुगार अड्यावर गुन्हे शाखेने तीन महिन्यातच दुसऱ्यांदा छापा मारून ३९ जुगारींना ताब्यात घेतले. गतवर्षी दोन वेळा कारवाई करूनही तनवाणीने पुन्हा त्याच ठिकाणी कॅसिनो स्टाईलने जुगार अड्डा सुरूच ठेवला होता.

ही कारवाई बुधवारी (दि. १८) सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. ४० जणांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, पत्त्यांचे कॅट आणि डीव्हीआर असा ३ लाख ११ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखा आणि पास २० पथकाने दादा डोसा दुकानाच्या पाठीमागील लोखंडी जिन्याने वर चढून पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी गोलाकार टेबलाभोवती ३३ जण जुगार खेळताना, काऊंटरवर व शेजारी २ जण बसलेले, तर ३ जण उभे असल्याचे आढळून आले.

चौकशीदरम्यान हा अड्डा विष्णू तनवाणी चालवत असून, त्याच्या सांगण्यावरून मॅनेजर गोलू वर्मा आणि प्रकाश चौधरी हे ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन जुगार खेळण्यासाठी प्लास्टिकचे कॉईन देत होते. त्यावर 'झन्ना-मन्ना' जुगार खेळवला जात असे. खेळ संपल्यानंतर शिल्लक कॉईन जमा करणाऱ्यांना काऊंटरवरून रोख रक्कम परत दिली जात होती.

या अड्ड्यावर आकाश झाटीवाले, निलेश गवळी आणि कलीम पठाण हे मदतनीस होते. ३४ जुगाऱ्यांमध्ये शहरासह इगतपुरी, वैजापूर, खुलताबाद, वेरूळ गांधेली, चितेगाव, ढोरकीन येथील व्यक्तीही आल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवा-यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, पाथरकर अंमलदार राजेंद्र साळुंखे, श्रीकांत काळे, विजय निकम योगेश नवसारे, कोतकर आदींच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT