Satellite AYUSH Clinics : सॅटेलाईट आयुष दवाखाने जिल्ह्यात लवकरच रुग्णसेवेत  Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Satellite AYUSH Clinics : सॅटेलाईट आयुष दवाखाने जिल्ह्यात लवकरच रुग्णसेवेत

ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये लवकरच सॅटेलाईट आयुष दवाखाने सुरू केले जाणार आहेत. यादृष्टीने आरोग्य विभागाची तयारी सुरू आहे. या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आयुष सेवेचा अधिक व्यापक लाभमिळणार आहे, असे जिल्हा आयुष अधिकारी डॉ. शेख शकील अहमद यांनी सांगितले.

चिकलठाणा येथील मिनी घाटीत मंगळवारी (दि. २३) दहावा आयुर्वेद दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. अहमद यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. भरती नागरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे, मेट्रन डॉ. शुभांगी थोरात तसेच डॉ. सफिना खान यांचे प्रमुख उपस्थिती होती.

आयुर्वेद ही भारताची प्राचीन आणि वैज्ञानिक वैद्यकीय परंपरा आहे. निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगण्याचा संदेश देणाऱ्या या शास्त्राच्या जागतिक प्रसारासाठी दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. यावेळी जिल्ह्यातील आयुष सेवा याची माहिती या कार्यक्रमात सविस्तर देण्यात आली. तसेच या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना तेजस्विनी तुपसागर यांनी केली.

धनतेरसऐवजी २३ सप्टेंबरला करावा आयुर्वेद दिन

२३ सप्टेंबर हा दिवस व रात्र समान असण्याचा दिवस आहे. समतोल आणि संतुलन आयुर्वेदाची मूळ संकल्पना आहे. या दिवसाचे प्रतीकात्मक महत्त्व लक्षात घेऊनच हा दिन राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून निवडण्यात आला आहे. यामुळे धनतेरसऐवजी २३ सप्टेंबर रोजी आयुर्वेद दिन साजरा करावा, याचे महत्त्व अधोरेखित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT