St Bus : दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी विविध मार्गांवर ३२ जादा बस

कामानिमित्त शहराबाहेर किंवा शहरात असणारे चाकरमाने दिवाळीत आपापल्या गावी जातात. या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विविध मार्गांवर जादा बससेवा देण्याचे नियोजन केले आहे.
ST Bus
St Bus : दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी विविध मार्गांवर ३२ जादा बस(source- MSRTC)
Published on
Updated on

ST Bus : 32 additional buses on various routes for passengers on the occasion of Diwali

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कामानिमित्त शहराबाहेर किंवा शहरात असणारे चाकरमाने दिवाळीत आपापल्या गावी जातात. या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विविध मार्गांवर जादा बससेवा देण्याचे नियोजन केले आहे. या काळात छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच आगारांतून सुमारे ३२ जादा बस सेवा देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

ST Bus
Sambhajinagar News : जिल्ह्यातील ३६०० शिक्षक कार्यमुक्त : चुकीची माहिती भरलेल्यांवर होणार निलंबनाची कारवाई

नुकतेच पितृपक्ष पंधरवडा संपला त्यानंतर विविध मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ही गर्दी येणाऱ्या दिवसांत जास्त वाढणार आहे. दिवाळीनिमित्त तर यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. ही बाब लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या आणि गर्दी असलेल्या मार्गावर जादा बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच आगारांतून ही सेवा देण्यात येणार आहे. यात नागपूर, अकोला, लातूर, पुणे, बुलढाणा, जळगाव, भुसावळ, नाशिक, धुळे, शिर्डी, आदी मार्गांचा समावेश आहे. दिवाळी काळात सर्वच मार्गांवर प्रवाशांची गर्दी असल्याने त्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

ST Bus
Marathwada heavy rain : मराठवाड्यात हाहाकार; पिके सपाट, नुकसान अफाट

१४ हजार किलोमीटरपेक्षा जास्त सेवा

दिवाळीनिमित्त धा-वणाऱ्या या बसेसना कोणत्या आगारांतून कोणत्या मार्गावर सोडायाचे आणि त्या बसने किती किलोमीटर अंतरापर्यंत सेवा द्यायची याचे नियोजन करण्यात आले आहे. या ३२ बसेस दिवाळी दरम्यान सुमारे १४ हजार ५३८ किलोमीटरच्या अंतरापर्यंत प्रवाशांना सेवा देणार असल्याचीही माहिती घाणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news