Satara Gazette not implemented month trouble next election : Jarange
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा आर-क्षणाचे आंदोलन संपलेले नाही, ते कोणी आणि कधीच संपू शकत नाही. येत्या महिनाभरात सातारा गॅझेट लागू झाले नाही तर, पुढील निवडणुकीत सरकारचा धुरळा उडवू, एकाही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास असल्याचे मतही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केले.
जरांगे यांच्यावर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून गुरुवारी (दि.४) सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले, मराठवाडा आणि सातारा गॅझेटनंतर कोकण, विदर्भ बाकी आहे. त्यामुळे आंदोलन अजून थांबले नाही. जोपर्यंत मी प्रामाणिक आहे, तोपर्यंत समाज मला आणि मी समाजाला सोडू शकत नाही.
उद्या मी बोललो तर लाखोच्या संख्येने लोक मोर्चाला निघतील. त्यामुळे सरकार आम्हाला आता फसवण्याचा विचारही करू शकत नाही. तसेच खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना ते म्हणाले, मला आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा कोणाचे ऐकून करायचे असते, तर आरक्षण नको म्हणालो असतो. मला मुख्यमंत्री फडणवीसांना घेरायचे असते, तर वर्षा बंगल्यावर घेरले असते. आरक्षण गेले खड्यात म्हटले असते. मला राजकारण नकोय, आरक्षण पाहिजे हे दोन वर्षांत सिद्ध केले. त्यामुळे राऊत कोणत्या उद्देशाने म्हणाले हे माहिती नाही. तसेच मंत्री छगन भुजबळ हे कार्यकर्त्यांचे आणि पक्षांचे राजकीय अस्तित्व संपवणारा माणूस असल्याची टीका देखील केली.
मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती आहे तशीच उपस्थिती ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली, आम्हाला काही अडचण नाही. मात्र याचसोबत दलित, मुस्लिमांसाठी देखील उपसमिती गठीत करा. एक उपसमिती शेतकऱ्यांसाठी करा. आदिवासींसाठी एक करा आणि मायक्रो ओबीसीसाठी एक उपसमिती करा, असे जरांगे म्हणाले.
शिवसेना नेते (उबाठा) अंबादास दानवे यांनी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी मराठा आरक्षणाला आजवरचे सर्वात मोठे यश मिळाल्याचे सांगत पुढील टप्प्याटप्प्याने होणाऱ्या आरक्षण प्रक्रियेत समाजाला निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
खासदार संदीपान भुमरे यांनी गुरुवारी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यांनी शासनाने काढलेल्या जीआरचा फायदा सर्वांना होणार असल्याचे सांगितले. खासदार, संजय राऊतांवर टीका करत भुमरे म्हणाले की, त्यांना आरोपांशिवाय दुसरे काही काम नाही. आर-क्षणाविषयी सविस्तर बोलण्याचे काम जरांगे करतील, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
जी.आर. वर कुणी कितीही संभ्रम निर्माण केला, तरी माझा समाज कुणावर विश्वास ठेवत नाही. मी पण कुणावर विश्वास ठेवणार नाही. जे आता बोंबलत आहेत, जीआरबद्दल जे संभ्रम निर्माण करत आहेत, ते आधी कुठे झोपले होते? मी मराठा आर-क्षणाच्या अभ्यासकांना मुंबईत बोलावले होते, ते आले नाही. मात्र आता त्यांना बोलवणार नाही, मी माझाच निर्णय घेणार आहे. ते केवळ टीव्हीवर बोलायला पुढे आहेत.
शिवसेना नेते (उबाठा) अंबादास दानवे यांनी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी मराठा आरक्षणाला आजवरचे सर्वात मोठे यश मिळाल्याचे सांगत पुढील टप्प्याटप्प्याने होणाऱ्या आरक्षण प्रक्रियेत समाजाला निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.