शिक्षक संघाकडून समायोजन वेळापत्रकाची होळी ! file photo
छत्रपती संभाजीनगर

शिक्षक संघाकडून समायोजन वेळापत्रकाची होळी !

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत शिक्षकांवर सरसकट गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा निषेध

पुढारी वृत्तसेवा

sambhajinagar teacher news

छत्रपती संभाजीनगर, पुढारीवृत्तसेवाः मराठवाडा शिक्षक संघाच्यावतीने बुधवारी (दि.१८) शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शासनाच्या संचमान्यता निकष व समायोजन वेळापत्रकाची होळी करण्यात आली. मुख्य उद्देश एसएससी व एचएससी बोर्ड परी क्षेच्या काळात नियोजित समायोजन प्रक्रिया तारखा बदलण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संचमान्यता निकष व समायोजन वेळापत्रकाविरुद्ध मराठवाडा शिक्षक संघाने आंदोलन पुकारले आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातील नववी व दहावीच्या किमान संख्येच्या अटींमुळे राज्यातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात फुगलेली आहे, त्यात संशोधन करून सुधारित निकष तयार करण्यात यावेत. तसेच एचएसएससी बोर्ड परीक्षेत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत शिक्षकांवर सरसकट गुन्हे दाखल होत आहेत.

त्याची संपूर्ण चौकशीशिवाय सरसकट गुन्हे दाखल करू नयेत, हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी बुधवारी शिक्षण उर्पसचालक कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी समायोजन वेळापत्रकाची होळी करण्यात आली. मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा सचिव चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय कार्यकारिणीचे सहसचिव राजकुमार कदम, केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे महानगर सचिव नवनाथ मंत्री, अशोक ढमढेरे, रावसाहेब बोरसे, विनोद केनेकर, विलास चव्हाण, कृष्णा गोंडे, रवींद्र मगर, रामेश्वर गोराडे, संभाजी जाधव, सचिन मुसळे, सागर सूर्यवंशी, तुकाराम भवर, धनंजय भवर, अजित जाधव, विवेक पाटील, जितेंद्र शिंदे, पद्माकर पगार, संतोष सुरडकर, अरुणा चौधरी, सविता हिंगे, सोनाली गव्हाणे, स्वाती बोंडे, रेखा साकळे यांच्यासह अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

...तर आंदोलन छेडणार

समायोजनाची नियोजन प्रक्रिया १३ फेब्रुवारी २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येऊ नये, या कालावधीत इयत्ता दहावी व बारावी परीक्षा सुरू आहेत. सर्व शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी परीक्षेच्या कामात व्यस्त आहेत, म्हणून ही समायोजन प्रक्रिया परीक्षा संपल्यानंतरच घ्यावी अन्यथा येणाऱ्या काळात संपूर्ण मराठवाड्यात उग्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT