Municipal Election : शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर, एमआयएम ठरला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष File photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal Election : शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर, एमआयएम ठरला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष

सेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व, एमआयएम 24 वरुन पोहोचली 33 वर

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Shiv Sena is in third place, and MIM has emerged as the second largest party

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने २९ प्रभागांतील ११५ पैकी तब्बल ५६ जागावर विजय मिळवित संभाजीनगरमध्ये आम्हीच मोठे भाऊ आहोत, हे शिवसेनेला दाखवून दिले आहे. तर एमआयएम ३३ जागांवर मिळवून महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून शिंदेसेना तब्बल तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. त्यांना केवळ १४ जागांवर विजय मिळविता आला.

महापालिकेच्या निवडणूकीत जागा वाटपावरुन शेवटच्या क्षणी शिवसेना-भाजपची युती तुटली. शिंदेसेनेने मोठा भाऊ आम्हीच आहोत. त्यामुळे जास्त जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजे, असा दावा केला होता. तर त्यास नकार देत शहरात आमची ताकद वाढली असून जास्त जागा आम्हालाच मिळाव्यात, असे दावा केला होता.

भाजप-शिवसेनेत जागा वाटपावरुन सुरू असलेली रस्सीखेच मुंबईपर्यंत गेली होती. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करुनही स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही. यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपला जास्त जागा देत कमी जाग घेण्याची तयारी दर्शविली होती. पंरतु, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी विरोध दर्शविला होता. त्यात जंजाळ यांच्यासह सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले होते.

त्यामुळे रात्रीतून निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी पालकमंत्री शिरसाट यांनी युती तुटल्याचे जाहीर केले. युती तुटल्यानेच अनेक जागांवर मतविभाजपनाचा लाभ एमआयएमला मिळला. यात गुलमंडीतील दोन जागा केवळ मत विभाजनामुळेच भाजप-शिवसेनेला गमवाव्या लागल्या आहेत.

सेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व

छत्रपती संभाजीनगर शहर शिवसेनाचा बालेकिल्ला समजाला जात होता. महापालिकेच्या पहिल्या निवडणूकीपासून (१९८८ सालापासून ) महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. तर या पहिल्या निवडणुकीत भाजपला खातेही खोलता आले नव्हते. परंतु, ३८ वर्षानंतर भाजप ५६ जागा मिळवित पहिल्या क्रमांकावर गेली आहे. तर शिवसेना २९ जागांवरुन थेट १२ वर आले आहे. त्यामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपने वर्चस्व मिळविले असेच चित्र निवडणुकीच्या निकालातून पुढे आले आहे.

एमआयएम २४ वरुन ३३

एमआयएमने २०१४ साली विधानसभा निवडणुकीतून शहरात प्रवेश केला. त्यानंतर २०१५ साली पहिली महापालिका निवडणूक लढविली. त्यात २४ नगरसेवक विजयी झाले होते. तर एक समर्थक नगरसेवकाचा समावेश होता. तो दहा वर्षानंतर ३३ वर गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT