Sambhajinagar News : रिक्षांच्या गराड्याने प्रवाशांना बाहेर पडणे मुश्कील file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : रिक्षांच्या गराड्याने प्रवाशांना बाहेर पडणे मुश्कील

रेल्वेस्थानकात रस्ता शोधताना प्रवाशांची तारेवरची कसरत

पुढारी वृत्तसेवा

sambhajinagar railway station new building work traffic jam passenger crowd

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या नवीन इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. नवीन इमारत होईपर्यंत रेल्वे प्रशासनाने तात्पुतरते प्रवेश-र द्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग प्रवाशांना उपलब्ध न करून दिला आहे. दरम्यान, या मार्गावर व रिक्षाचालकांनी कब्जा केल्याने प्रवाशांना रस्त्याची शोधशोध करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेल्वे सुरक्षा दलासह लोहमार्ग पोलिस याकडे कानाडोळा करत असल्याने प्रवाशांनी रिक्षाचालकांच्या या दंबगपणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

या रेल्वेस्थानकावर मुंबई व नांदेड या मार्गावर न रेल्वे धावतात. या ठिकाणाहून दररोज हजरो प्रवासी ये-जा करतात. नवीन रेल्वेस्थानकाचे काम सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने तात्पुरते प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग प्रवाशांसाठी केला आहे. बाहेर पडण्याच्या मार्गावर दोन्ही बाजूंनी रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी चढाओढ करतात, दरम्यान, अनेक प्रवाशांना नातेवाईक घेण्यासाठी येतात, त्यांना रिक्षाची गरज नसते. तरीही रिक्षाचालक त्यांना रिक्षा हवी का म्हणून भंडावून सोडतात. त्यामुळे प्रवाशांना सामान घेऊन स्टेशन बाहेर पडण्यासाठी घामाघूम होण्याची वेळ आली आहे. रिक्षाचालकांच्या या बेशिस्तपणामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

स्पर्धेचा त्रास प्रवाशांनाच

प्रवासी मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची मोठी स्पर्धा असते, अनेज चक्क प्रवाशांच्या हाताला धरून आमच्या रिक्षात चला असे म्हणतात. समोरच्याला रिक्षाची गरज आहे किंवा नाही याची खातरजमा रिक्षाचालक करायला तयार नसल्याने याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या प्रसंगामुळे अनेकदा रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात वाद झाले आहेत.

रिक्षाचालकांना शिस्त लावा

रेल्वेस्थानकातून बाहेर पडतानाच रिक्षाचालक दोन्ही बाजूंनी गराडा घालत असल्याने प्रवाशांना सामान घेऊन रस्ता शोधणे गैरसोयीचे होते. यासाठी रिक्षा चालकांना रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी शिस्त लावावी, यासाठी कठोर कारवाईची बडगाही उचलावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

नावालाच सुरक्षा दल

रेल्वे स्थानक परिसरातील तसेच रेल्वेतील सुरक्षा ही रेल्वे सुरक्षा दलांकडे असते. अनेक दिवसांपासून प्रवाशांना या रिक्षाचालकांच्या त्रासांचा सामना करावा लागत आहे. ते त्यांना शिस्त लावण्यास तयार नाहीत. सुरक्षा दलाचे जवान परिसरात साधा फेरफटकाही मारत नसल्याने रिक्षा चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT