

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालक म्हटले की, उर्मट, नशा करणारे, जवळच्या प्रवाशांना सेवा न देणे ही प्रतिमा सर्वसामांन्य नागरिकांत तयार झाली आहे. परंतु याला छेद देत काही रिक्षाचालक स्वतःच्या खिशाला झळ लावत प्रवाशांसह रिक्षाचालकांना जारचे थंड पाणी देत सामाजिक भावना जपत आहेत. फाजलपुरा रिक्षास्टँडवरील एजाज खान या रिक्षाचालकाने है प्रत हाती घेतले आहे. तसेच काही रिक्षाचालक गावरान जुगाड करत प्रवाशांना थंडाव्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहेत.
उन्हाच्या काहिलीमुळे घशाला कोरड पडलेली असताना अशात कोणी बंडगार पाणी पिण्यास उपलब्ध करून दिल्यास पाणी पिणारे त्याला मनातून आशीर्वाद देतील, असेच काम फाजलपुरा रिक्षास्टेंडवरून प्रवासी सेवा करणारे एजाज खान रिक्षाचालक करत आहेत. ते प्रवासी सेवा करण्यासाठी स्टैंडवर येताच थंडगार जारचे पाणी रिक्षात ठेवतात.
प्रवासी सेवा करताना सत्यात रिक्षाचालक असो की, प्रवासी त्यांना ते थंड पाणी उपलब्ध करून देतात, उन्हाच्या काहिलीत प्रवाशांना थंडाव्याचा अनुभव देण्यासाठी काही रिक्षाचालकांनी देशी जुगाड करत हा छोटासा प्रयत्न केला आहे. अनेकांनी रिक्षाच्या टपावर चवक बारदाण्याचे तीन थर अंथरून ते पाण्याने भिजवत प्रवाशांना थंडावा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही रिक्षाचालकांनी टपाच्या आतून फोम लावून उन्हाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक रिक्षाचालक पायाखाली मेंट, आजूचाजूला छोट्या रोपट्यांच्या कुंड्या ठेचून वातावरण बदलवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रवासीही अशा सुविधेसाठी जादा पैसे देण्यास तयार होतात, मात्र शहरात गदक लाईनवर चालणाऱ्या रिक्षांची संख्या जास्त आहे. प्रवाशीही याच रिक्षांना पसंती देत असल्याने रिक्षाचालक त्यांना सुविधा देण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे.