Sambhajinagar Political News ZP Group Reservation Announced
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट, गणांची अखेर सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण प्रक्रियेत अनेक दिग्गजांना फटका बसला. छत्रपती संभाजीनगर जि.प. च्या माजी अध्यक्षा मीना शेळके, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, रमेश गायकवाड यांच्यासह अनेक दिग्गजांचे मतदारसंघ आरक्षित झाले. त्यामुळे त्यांना एकतर अन्य गटाचा शोध घ्यावा लागणार आहे किंवा घरीच बसावे लागेल.
जालना जिल्हा परिषद आरक्षण सोडत ही अनेक दिग्गजांना आपले मतदारसंघ आरक्षित झाल्याचा फटका बसला. या निवडणुका जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे दिवाळीनंतर निवडणूक तारखा घोषित होतील, असा अंदाज आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ६३ गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मिनी मंत्रालयात पुन्हा परतण्याची आशा बाळगणाऱ्या माजी अध्यक्षा मीना शेळके, माजी उपाध्यक्ष केशव तायडे, माजी सदस्य एल. जी. गायकवाड, शिवाजी पाथरीकर, रमेश गायकवाड, बबन कुंडारे, सुरेश सोनवणे यांच्यासह अनेक अनुभवी सदस्यांचेही गट आरक्षित ठरल्याने त्यांना यंदा मैदानाबाहेर बसावे लागणार आहे. श्रीराम महाजन, विनोद तांबे, पूनम राजपूत, वैशाली पाटील, संदीप सपकाळ, प्रकाश चांगुलपाये,
जालना : जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांचा आष्टी गट महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांना नवीन गट शोधावा लागणार आहे. तसेच अनिरुद्ध खोतकर आणि अभिमन्यू खोतकर हे दोघे इच्छुक असलेला रेवगाव गट ही महिसेसाठी राखीव झाला. रमेश गव्हाड यांचा भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रुक हा गट ही ओबीसी महिलेसाठी राखीव झाला. जालना परिषदेच्या ५७ गटांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
भोकरदन तालुक्यातील प्रमुख गट राखीव झाले आहेत. त्यात वालसावंगी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पारध गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. जाफराबादमधील माहोरा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), जवखेडा ठेंग अनुसूचित जाती (महिला) तर टेंभुर्णी गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. याशिवाय गेवराई बाजार : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), शेलगाव अनुसूचित जाती, सेवली अनुसूचित जाती, नेर सर्वसाधारण, रामनगर सर्वसाधारण (महिला) साठी राखीव झाले आहे. मंठ्यातल पांगरी गोसावी, आष्टी महिलांना सुटला आहे.