Sambhajinagar News : बारा अधिकाऱ्यांना शो-कॉज, गैरहजर कर्मचाऱ्यांची वेतन कपात file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : बारा अधिकाऱ्यांना शो-कॉज, गैरहजर कर्मचाऱ्यांची वेतन कपात

जिल्हाधिकाऱ्यांची लेटलतिफांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Show-cause notice to twelve officers, salary cut for absent employees

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयातील महसुली बाबूंच्या मलेट लतिफफ कारभारावर दै. पुढारीने बुधवारी (दि.११) सविस्तर प्रकाश टाकला. बहुसंख्य महसुली कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर असल्याची बाब पुढारीच्या वृत्तातून मांडण्यात आली होती.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याची गंभीर दखल घेत सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच बारा विभागप्रमुखांना शो कॉज (कारणे दाखवा) नोटीस बजावली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांचा समावेश असून, या सर्वांना ४८ तासांत खुलासा करण्याचे राज्य सरकारने २९ फेब्रुवारी २०२० पासून राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे.

शनिवार व रविवार सुटी जाहीर करून सोमवार ते शुक्रवारदरम्यान कार्यालयीन वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी ४५ मिनिटांनी वाढवण्यात आली. मात्र छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामीण तहसील कार्यालय आणि अप्पर तहसील कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांकडून या वेळेला हरताळ फासला जात आहे.

पुढारीच्या प्रतिनिधीने मंगळवारी सकाळी ९:४५ ते ११ या वेळेत या तिन्ही कार्यालयांत जाऊन पाहणी केली, तेव्हा बहुसंख्य टेबलांवर शुकशुकाट होता. काही कर्मचारी सकाळी १०:००, काही १०:३० तर काही चक्क ११:०० वाजता निवांतपणे कार्यालयात दाखल झाले. त्याबाबत दै. पुढारीने बुधवारच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित केले.

त्याची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बारा विभागप्रमुख अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. वारंवार सूचना देऊनही आपले अधिनस्थ कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर राहत नाहीत. तुमचे कर्मचाऱ्यांवर योग्य नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. याबाबात ४८ तासांत खुलासा करावा, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. शो कॉज बजावलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अप्पर तहसीलदार, ग्रामीण तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिका-यांचा समावेश आहे.

कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार होणार कपात

जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवण्यासाठी प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ड्यूटी पर हे अॅप कार्यान्वित केले आहे. या अॅपवरच कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवली जाते. मंगळवारी कार्यालयात वेळेवर न आलेल्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे, तसेच सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांना भविष्यात कार्यालयीन वेळा पाळण्याबाबत लेखी ताकीद देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT