LPG सिलेंडर की इंडक्शन – स्वयंपाकासाठी कोणता पर्याय स्वस्त?

पुढारी वृत्तसेवा

LPG सिलेंडर की इंडक्शन?

स्वयंपाकासाठी कोणता पर्याय स्वस्त? संपूर्ण खर्चाचं गणित जाणून घ्या.

LPG vs Induction | Pudhari

गॅस पुरवठ्यावर परिणाम

मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरही दिसू लागला आहे.

LPG vs Induction | Pudhari

पर्याय काय?

गॅसच्या संभाव्य टंचाईच्या बातम्यांमुळे अनेक ग्राहक पर्याय शोधत आहेत. यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शन कुकटॉपची मागणी अचानक वाढली आहे.

LPG vs Induction | Pudhari

महानगरांमध्ये इंडक्शनची मागणी

दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये इंडक्शन कुकटॉपची विक्री झपाट्याने वाढली. काही ठिकाणी दुकानदारांकडचे इंडक्शन स्टॉक संपले आहेत.

LPG vs Induction | Pudhari

गॅस स्टोव्ह

गॅसवर स्वयंपाक करताना निर्माण होणारी जवळपास 60% उष्णता वाया जाते. म्हणजेच तुम्ही गॅससाठी दिलेल्या पैशांपैकी फक्त 40% ऊर्जा वापरता.

LPG vs Induction | Pudhari

आधुनिक तंत्रज्ञान

इंडक्शन कुकटॉप चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने थेट भांड्यात उष्णता निर्माण करतो. यामुळे ऊर्जा कमी वाया जाते आणि त्याची कार्यक्षमता सुमारे 90% असते.

LPG vs Induction | Pudhari

LPG सिलेंडरचा खर्च

शहरात 14.2 किलोचा LPG सिलेंडर साधारण ₹913 च्या आसपास आहे. काही ठिकाणी हा खर्च ₹1200 ते ₹1500 पर्यंतही जाऊ शकतो.

LPG vs Induction | Pudhari

इंडक्शनचा खर्च

एका सिलेंडरइतकी ऊर्जा मिळवण्यासाठी इंडक्शनला सुमारे 78 युनिट वीज लागते. जर वीज दर ₹8 प्रति युनिट धरला तर महिन्याचा खर्च सुमारे ₹624 येतो.

LPG vs Induction | Pudhari

महिन्याला किती बचत?

गॅसच्या तुलनेत इंडक्शनवर स्वयंपाक केल्यास दरमहा सुमारे ₹300 पर्यंत बचत होऊ शकते.

LPG vs Induction | Pudhari

सुरुवातीचा खर्च

इंडक्शन कुकटॉपची किंमत साधारण ₹2000 ते ₹4000 असते आणि त्यासाठी विशेष भांडी घ्यावी लागतात. तरीही इंडक्शन हा स्वयंपाकासाठी स्वस्त पर्याय आहे.

LPG vs Induction | Pudhari

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं पुस्तक कोणतं लिहिलं होतं? तुम्हाला माहितेय का?

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari
येथे क्लिक करा