Verul Caves : वेरूळ लेण्यांतील बुद्धमूर्तीवर किरणोत्सव

किरणोत्सव पाहण्यासाठी लेणी अभ्यासक, इतिहासप्रेमींची मोठी उपस्थिती
sambhajinagar news
वेरूळ लेण्यांतील बुद्धमूर्तीवर किरणोत्सवfile photo
Published on
Updated on

Kiranutsav on the Buddha statue in Verul caves

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या दहा नंबर लेणीतील बौद्ध मूर्तीवर पडणारा किरण ोत्सव सोहळा दरवर्षी १० मार्च रोजी अनुभवता येतो. यंदा हा सोहळा मंगळवारी (दि.१०) लेणी बंद असल्यामुळे अनुभवता आला नव्हता. मात्र बुधवारी (दि.११) पर्यटकांसह इतिहासप्रेमींनी अलोट गर्दी करत हा तेजोमय सोहळा अनुभवला. मात्र त्याचवेळी बौध्द उपासकांनी लेणी परिसरात घोषणाबाजी करीत पुरातत्व विभागाचा जाहीर निषेधही केला.

sambhajinagar news
LPG Shortage News : घरगुती गॅस मिळेना, ऑनलाईन बुकिंग यंत्रणाही कोलमडली

स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार आहेत. यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे थेट मूर्तीच्या चेहऱ्यावर पडतात.

महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांमधील हे शेवटचे चैत्य असून, हा महायान पंथाला समर्पित आहे. यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे पहावयास मिळतात. यालाच सुतार की झोपडी किंवा विश्वकर्मा मंदिरही म्हणतात. लेणीत प्रवेश केल्याबरोबरच बोधीवृक्षाखाली बसलेल्या भगवान बुद्धांची मूर्ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळते.

sambhajinagar news
Sambhajinagar News : जन्म-मृत्यू दाखल्यांबाबतच्या तक्रारींचे निवारण करा

भगवान बुद्धांच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तसेच मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. समोरच वाद्यमंडप असून, पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून लोकांना सकाळी व संध्याकाळी आरतीला बोलविण्याची प्रथा होती.

दरवर्षी गर्दी मागील सहा वर्षांपासून दरवर्षी हा सूर्यकिरणोत्सव होत असतो. हा विलक्षण क्षण अनुभवण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी गर्दी करतात. पुढील काही दिवस हा सोहळा अनुभवता येणार असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. बुधवारी राज्यभरातील लेणी अभ्यासक, इतिहासप्रेमी यांच्यासह बौध्द उपासकांनी हा तेजोमय सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news