Sambhajinagar News: Private Vehicles for Relatives at Main Bus Stand
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बसस्थानकांत बस प्लॅटफॉर्मवर लावताना आणि ती मार्गस्थ होताना अनेकदा नजरचुकीने अपघात होतात, अशा अवस्थेतही नातेवाईकांना सोडण्याासाठी आलेली चारचाकी वाहने चक्क मुख्य बसस्थानकांतील प्लॅटफॉर्म जवळ उभे राहत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व आगारप्रमुख आणि बसस्थानकप्रमुखांच्या डोळ्यासमोर होत असतानाही ते डोळेझाक करत असल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येत आहे. बसस्थानकाच्या आतील परिसरात खासगी वाहनांना परवानगी नसते. प्रसंगी दिव्यांग किंवा ज्याला चालता येत नाही अशा प्रवाशांसाठी व्हील चेअरची सुविधा उपलब्ध आहे.
असे असतानाही नातेवाईकांना सोडण्यासाठी आलेले खासगी चारचाकी वाहने चक्क प्लॅटफॉर्मजवळ उभे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी सुरक्षा रक्षकांवर दरमहा लाखो रुपये खर्च करते. तरीही खासगी वाहने चक्क प्लॅटफॉर्मपर्यंत येत असल्याने अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत.
अपघाताची शक्यता
प्रवासी भरल्यानंतर तेथून बस रिव्हर्स येत असते. अनेकदा पाठीमागे थांबलेल्या खासगी वाहनांवर बस आदळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात झालाच तर चालक वाहकांवर खापर फोडून अधिकारी नामानिराळे होण्याची शक्यता आहे. याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन खासगी वाहनधारकांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्लॅटफॉर्म जवळच केबिन
मुख्य बसस्थानकांतील आगारप्रमुख व बसस्थानक प्रमुखांच्या केविन या प्लॅटफॉर्म शेजारीच आहेत. त्यांना केबिनमधूनही परिसर त्यांच्या डोळ्याखाली येतो. असे असतानाही प्लॅटफॉर्मपर्यंत आलेल्या खासगी वाहनांकडे मात्र जाणूनबुजून डोळेझाक करत आहेत. याचबरोबर परिसरातील कोपरा न कोपरा येथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतो. याची स्क्रीन आगारप्रमुखांच्या केबिनमध्येच आहे. असे असतानाही खासगी वाहनधारकांना तंबी देण्याची तसदी कोणीच